परांडा किल्ला (Paranda Fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

परांडा किल्ला

इतिहास
हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गवानने हा किल्ला सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला.इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्य अहमद नगर च्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले. जरी मुघल जिंकले असले तरी निजाम शाहीच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाने राज्य चालविण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमद नगर च्या आग्नेयेला सुमारे ८० मैलांवर असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली.[२]काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली.इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी हैद्राबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत परांडा किल्ला.कल्याणीच्या चालुक्यांच्या काळात परिमंडा (परांडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता. तेथील किल्ला हा ३५ मिटर लांब व तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला इ.स. १६०० च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६२८ साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १६३० मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला. त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ १६३२ साली विजापूर येथे नेली. महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील त्याच नावाच्या तालुक्याचे व इतिहासप्रसिद्ध किल्ल्याचे ठिकाण. लोकसंख्या ८,७९८ (१९७१). बार्शीच्या पश्चिमेस सु. २७ किमी.वर सीना व तिच्या उपनद्यांदरम्यान ते वसले आहे. पुराणात याचा उल्लेख परमधामपूर या नावाने आढळतो. पुढे त्यास प्रचंडपूर म्हणू लागले आणि त्यानंतर परांडा हे नाव रूढ झाले.

येथे नगरपालिका असून सर्व तहसील कार्यालये आहेत. गावाच्या मध्यवस्तीत परांडा हा भुईकोट किल्ला आहे. त्याच्याभोवती खंदक आहे आणि २६ बुरूजांच्या तटांच्या आत काही वास्तू व एक मशीद आहे. या मशिदीच्या मागे बऱ्याच अंतरावर एका तळघरात काही वीरगळ व शिल्पे आहेत. तसेच मशिदीचे स्तंभ व तीवरील जाळीकाम मुसलमानपूर्व काळातील हिंदू मंदिरांची शैली सूचित करतात.हेमाद्रीने आपल्याचतुर्वर्गचिंतामणि ग्रंथातील व्रतखंडाच्या प्रस्तावनेत यादव घराण्यातील भिल्लम राजाने प्रत्यंडकाच्या राजाला जिंकले, असे म्हटले आहे. हे प्रत्यंकड म्हणजेच परांडा असावा. परमानंद कवीच्या श्रीशिवभारत काव्यात त्याचा निर्देश प्रचंडपूर म्हणून केलेला आढळतो. बहमनी सुलतानांपैकी दुसरा महंमूदशाह याच्या महमूद गावान या मुख्यमंत्र्याने तो बांधला असावा असे एक मत आहे, तर तो महमूद ख्बाजा गावान याने बांधला असावा, असे दुसरे मत आहे. बहमनी सत्तेच्या -हासानंतर तो अहमदनगरच्या निजामशाही सत्तेखाली आला. निजामशाहीत या किल्ल्यास अधिक महत्त्व प्राप्त झाले. १३०० मध्ये मोगलांनी काही काळ त्यावर आधिपत्य गाजविले. शहाजीच्या ताब्यात हा किल्ला काही वर्षे होता. आदिलशाहाने १६३० मध्ये हा किल्ला जिंकल आणि तेथील मूलूक मैदान (मालिक मैदान) हि मोठी तोफ विजापूरला नेली. पुन्हा १६५७ मध्ये तो मोगलांकडे गेला. विजापूरची आदिलशाही व दिल्लीचे मोगल यांच्या ताब्यात आलटून पालटून हा किल्ला राहिला. पेशवाईत त्याला फारसे महत्त्व राहिले नाही.

पाहण्याचे ठिकाण
परांडा किल्ला हा भूदुर्गा मधील एक उत्कृष्ट नमुना आहे. किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी आहे. संपूर्ण किल्ल्याच्या सभोवती खंदक खोदलेला आहे. सध्या खंदकात पाण्याचा एक थेंब ही नाही. गडाच्या ईशान्य दिशेला प्रवेश करण्यासाठी पूल बांधलेला आहे. वेळप्रसंगी तो काढूनही ठेवता येईल अशी सोय केलेली आहे. गडाचे पहिले प्रवेशव्दार खूप भव्य आहे. त्याची लाकडी दारे आजही टिकून आहेत. पूलावरुन चालत गेल्यावर थेट पहिल्या प्रवेशव्दारातच आपण शिरतो. पहिल्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर डावीकडे वळल्यावर दुसरे प्रवेशव्दार लागते. यातून आत शिरल्यावर आपण चारही बाजूंनी तटबुरुज वेढलेल्या जागेत येतो. बुरुजांमधून छोट्या छोट्या तोफा आपल्यावर नजर रोखून बसविलेल्या दिसतात. पहिल्या व दुसर्‍या दरवाजाच्या तटबंदीवर जाण्यासाठी पायर्‍या केलेल्या आहेत. पुढे उजवीकडच्या बाजूला किल्ल्याचा तिसरा दरवाजा आहे. यातून आत शिरल्यावर समोरच एक मोठा बुरुज आडवा येतो. याला उजवीकडे वळसा घालून किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीमध्ये जाता येते. डावी कडे वळल्यावर तटबंदीच्या आडोशाला पहारेकर्‍यांसाठी देवड्या बांधलेल्या दिसतात. वाट उजवीकडे वळते तिथे किल्ल्याचा चौथा भव्य महाकाय असा दरवाजा आहे. देवड्र्‍यांच्या समोरच्या तटबंदीच्या बेचक्यातून वाट पुढे जाते ती थेट महादेवाच्या मंदिरापाशी घेऊन जाते. या वाटेने जातांना आपल्या दोन्ही बाजूला ४० फुटांची तटबंदी लागते.चौथ्या प्रवेशव्दाराची उंची जवळजवळ ४० ते ५० फुट असावी आणि बाजूला असणार्‍या बुरुजांची उंची तर जवळजवळ ६० फुट भरेल. दरवाज्याच्या समोर एक ५० फुट खोल अशी विहीर आहे. कमानीच्या समोरच एक महाकाय बुरुज आहे. त्यावर जवळजवळ २० फुट लांबीची तोफ आहे. येथे जाण्यासाठी दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे लागते. चौथ्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर समोरच एक मोठी मशिद आहे. खरे पाहाता ही मशीद म्हणजे पूर्वीचे माणकेश्वर मंदिर होते. आतमध्ये असणारे दगडी खांब, रचना या सर्व गोष्टी ते मंदिर असल्याची साक्ष देतात.या मशिदीच्या वर जाण्यासाठी पायर्‍र्‍यांची व्यवस्था केलेली दिसते. मशीद पाहून पुन्हा दरवाज्यापाशी यायचे आणि उजवीकडे निघायचे. डावीकडे देवड्या लागतात. यात तीन तोफा ठेवलेल्या आहेत. त्याच्या मागे असणार्‍या खोलीत असंख्य तोफगोळे पडलेले दिसतात. देवड्याच्या समोरच एक खोली सारखा भाग आहे, यात गणपतीची ४ फुट उंचीची मूर्ती आहे. शिवाय आजुबाजुला ही काही मूर्ती विखुरलेल्या दिसतात. हे सर्व पाहून पुन्हा देवड्र्‍यांपाशी यायचं, येथून तटबंदीच्या वर चढायचे. वाटेतच एक महादेवाचे छोटेसे मंदिर लागते. याच्याच बाजूला एक पायर्‍र्‍यांची भली मोठी विहीर आहे. आता पुढचा प्रवास हा तटबंदीवरुन करायचा. तटबंदी मध्येच बुरुज, परत तटबंदी अशी ही सर्व वाट आहे. प्रत्येक बुरुजावर एक भलीमोठी तोफ आहे. यातील बर्‍याच तोफा पंचधातूच्या आहेत.परांडाच्या तटबंदीवरुन फिरतांना या सर्व तोफा दिसतात. यापैकी काही तोफांची तोंडे मगरी सारखी आहेत. काहींची पाकळ्याच्या आकाराची आहेत. यामधील सर्वात मोठ्या तोफेची लांबी २० फुट आहे. मुख्य दरवाजाच्या वर वजनाने आणि आकाराने सर्वात मोठी तोफ आहे, जिचे नाव ‘मलिक ए मैदान’ असे आहे. अनेक तोफांवर फारसी शिलालेख कोरलेले दिसतात. एकुणच किल्ल्याची दुहेरी तटबंदी, अभेद्य बुरुज, त्यावर असणार्‍या तोफा आणि किल्ल्या भोवतीचा खंदक यामुळे हा भुईकोट किल्ला अभेद्य बनला होता. संपूर्ण किल्ला फिरण्यास दोन तास लागतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा