किल्ले कुंजरगड (Kunjargad Fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

किल्ले कुंजरगड

कुजंरगड किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो.हरीशचंद्र गडाच्या मागच्या बाजूस येणार्यात या डोंगररांगेवर कलाल, कुंजर, भैरवगड इत्यादी किल्ले येतात. “कुंज” या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे. याचाच अपभ्रंश होऊन “कुजंरगड” असे पडले असावे. विहिर या पायथ्याच्या गावातून हा गड हत्ती सारखा प्रचंड भासतो.हा किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो. पावसाळ्यात या भागात तूफान पाऊस पडतो. कधी कधी अनेक दिवस सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामूळे पावसाळा ऎन भरात असतांना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडा सारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत.कुंजरगडाचा उल्लेख इतिहासात मुख्यत्वे केला जातो. शिवचरित्रात याचा उल्लेख आढळतो.इतिहास सांगण्या अगोदर मला पडलेला प्रश्न असा की इतर रतनगडासारखा दुर्गरत्न असताना,हरिश्चंद्रगडासारखा पाठीराखा असताना महाराजांचा मुक्काम हा कुंजरगडावरच का? याचा अर्थ एकच की या भागातील बाकी किल्ल्यांच्या संरक्षणात वसलेला कुंजरगड हा मजबूत आणि पाठीराखा किल्ला आहे.महाराजांच्या पहिल्या सुरत लुटीवेळी महाराजांनी कांचनबारीच्या लढाईत पराक्रम गाजवून विश्रांतीसाठी हा गड निवडला होता. १६७० मध्ये महाराज सुरतेची दुसऱ्यांदा लुट करून महाराष्ट्रात नाशिक अहमदनगर आणि मग पुणे रायगड असा प्रवास करणार होते.कांचनबारी येथे मुघलांशी महाराजांचे युद्ध झाले आणि याचे नेतृत्व महाराजांनी करत मोकळ्या मैदानात महाराजांनी मोगलांचा पराभव केला.आता युद्धामुळे फौजेला विश्रांतीची आणि जखमींना सुश्रुषेची गरज होती.त्यामुळे महाराजांनी कुंजरगडावर हि सर्व व्यवस्था केली. येथेच प्रतापराव,आनंदराव व व्यंकोजीपंत यांच्यासह महाराज पुढचे बेत ठरवत होते. याच गडावर महाराज विश्रांती घेत असताना मोरोपंतानी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला असला तरी त्यांनी त्र्यंबकगडावर भगवे निशाण रोवले हा आनंद वेगळाच होता.कुंजरगडावरच मुक्काम करून राजे काही दिवसाने येथूनच ताज्या दमाने कारंज्याच्या मोहिमेवर निघाले.

पहाण्याची ठिकाणे :
विहिर या कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत. त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या मधून जाणार्याा वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो आणि गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात. या वाटेने गडावर चढतांना साधारणत: गडाच्या पाऊण उंचीवर एक वाट डावीकडे वळते. या वाटेने गडाला वळसा घालून जातांना वाटेत दाट झाडीत उघड्यावर ठेवलेल्या दोन मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून दुसर्याय मुर्तीला काळोबा म्हणतात. या मूर्त्या येथून हलवून गावात नेऊन मंदिर बांधण्याचा गावकर्यां चा मानस होता, परंतु त्यांना हलवणे आज पर्यंत शक्य झाले नाही, अशी कथा गावकरी सांगतात. कुंजरगडावर शिवाजी राजांनी मुक्काम केल्याची इ.स.१६७० मधील नोंद आहे. गडाची तटबंदी, वाड्याचे अवशेष, पाण्याची टाकी, घरांची जोती असे गडपणाचे अवशेष पहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरुन मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते. हरिश्चंद्रगड, कलाड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांगही दिसते.पायऱ्या उतरल्यावर तसेच थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेली गुहा लागते. गुहेच्या आतल्या कोपर्यातत एक सापट तयार झाली आहे. विजेर्यांधच्या उजेडात सावधगिरीने या सापटीत शिरावे लागते. सुरवातीला काही अंतर रांगत जावून नंतर झोपून डावीकडे वळावे लागते. जमीनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते. येथून आत शिरल्यावर पुढे हे भोक मोठे होत जाते. भोकाच्या टोकाला चार पाच जण उभे राहू शकतात. हे भोक कुंजरगडाच्या कड्यावर उघडत असल्याने येथून खालची दरी आणि निसर्ग उत्तम दिसतो. गडावर राहण्याची सोय नाही, परंतु तंबू किंवा तत्सम साहित्य नेल्यास मुक्काम करता येतो. गडावर पाण्याची टाकी असून हिवाळ्याच्या शेवटपर्यंत पाणी उपलब्ध असते. या मुर्ती पाहून मागे न जाता कड्याला लागून असलेल्या वाटेवरुन कारवीच्या दाट झाडीतून किल्ल्यावर जाता येते किंवा परत मागे फिरुन आलेल्या वाटेने दोन डोंगरामधील खिंडीतून गडावर जाता येते. पहिल्या मार्गाने डोंगराला पूर्ण वळसा घालून आपण विहिर गावाच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. या बाजूला फोफसंडी गावाकडून येणारी वाट येऊन मिळते. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्याब आहेत. अर्ध्या पायर्या चढल्यावर एक गुहा आहे, या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगराच्या आरपार खोदलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी विहिर गावच्या दिशेला व फोफसंडी गावाच्या बाजूस लक्ष ठेवणे शक्य होत असे. पावसाळ्यात व कडाक्याच्या थंडीत / उन्हात या गुहेचा चांगला उपयोग होत असावा. हि गुहा पाहुन पायर्यां च्या मार्गाने उध्वस्त प्रवेशव्दारातून आपण गडावर प्रवेश करतो. समोरच आपल्याला उध्वस्त वास्तुचे अवषेश दिसतात. प्रथम उजव्या बाजूला गेल्यावर पाण्याची सुकलेली २ टाकी दिसतात. या बाजूला किल्लाच्या माथ्यावरील पठार अरुंद होत जाते, टोकावरून दुरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. इथुन पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन विरुध्द (डाव्या बाजूच्या) टोकाकडे जातांना वाटेत पाण्याची ३ सुकलेली टाकी दिसतात. पुढे एका मोठ्या वाड्याचे अवषेश दिसतात.या वाड्यामागे (पिण्याच्या पाण्याच्या) दगडात कोरलेल्या टाक्यांचा समुह आहे. येथून प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. येथुन आलेल्या वाटेने परत न जाता सरळ जाता गडाला (उजव्या बाजुला) लागुन असणार्याे डोंगरावर जावे. या डोंगरावर ३ नैसर्गिक गुहा आहेत. गावकरी या गुहांचा उपयोग आपली गुरे बांधण्यासाठी करतात.या गुहा पाहुन डोंगर उतरुन विहिर गावात जाता येते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu