कोथळीगड
इतिहास
शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा, जवळील गावातून मिळविण्याकरिता गेला होता.गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दूल कादर व त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेवून आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचं सैन्य कापून काढले.हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दूल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुलफ़तह असेही नामकरण करण्यात आले.फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला जिंकुन घेण्याचा अयशस्वी प्रयास केला;ज्यात तो आणि त्याचे सैन्य मारले गेले.महाराष्ट्रात भैरवगड नावाचे किल्ले जवळपास ५ पेक्षा देखील जास्त आहेत. यात भर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातच दोन भैरवगड आहेत त्यातील एक म्हणजे शिरपुंज्याचा भैरवगड आणि दुसरा म्हणजे कोथळ्याचा भैरवगड होय.महाराष्ट्रात एकुण ६ भैरवगड आहेत. त्यापैकी २ भैरवगड हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत आहेत. हरिश्चंद्रगडावर टोलारखिंडी मार्गे येणार्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड आहे . तर राजुर मार्गे येणार्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंज्याचा भैरवगड आहे. शिरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, या उपयुक्त झाले होते भाऊ साठी ठेवा आपण ते करत आहेत. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत, हे ठार महान महत्व संलग्न आहे. उठला कल गडी बाद होण्याचा क्रम ठार कारण आणि दारुगोळा, जवळील गावात मिल्व्यांकरिता गेला होता.आहे की देखील त्याच-जुना मनुष्य मकोसी आणि पांढरा, मुळे ताब्यात समान आहे, जे ती दिली. युग स्वातंत्र्य मुन्शी बाबतीत असू हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत, व्यसन प्रतिनिधित्व आहे. तो मकोसी पांढरा करून प्रतिनिधित्व, आणि रात्री काळोख मॅनकुसी पांढरा, कोण यांनी होता आणि त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेत होते असे म्हणायचे आहे हा प्रवेश, आणि त्या पॅलेस येथे सैन्य कापून तो. हे आहे की सिंकलर की औरंगजेब होता कार्ल सोन्याची किल्ली भेट देत. या मिफ्ताहुल असे नामकरण करण्यात आले. लोकप्रतिनिधी कोणत्या बाबतीत हैदर 70.000 रुपये बक्षीस प्रदान करण्यात आले. उठला कल या शूर नायक हा किल्ला परत जिंकण्यासाठी अयशस्वी प्रयत्न त्याचे सैन्य कापून गेल्या.गडाला तसा काही इतिहास नाहीये पण टोलार खिंडीच्या मार्गावर देखरेखीसाठी हा गड वापरला असावा असे वाटते.गडावरील वास्तूंची रचना ही हरिश्चंद्रगडाच्या सारखीच आहे. त्यामुळे हा गड देखील हरिश्चंद्रगड सोबत बांधलेला असावा असे वाटते.
किल्ल्याला भेट
आपण दोन मार्गांनी या गडावर येऊ शकता. जर तुम्ही ओतूर ला आलात तर तिथून ३० कि.मी. अंतरावर कोतूळ गाव लागेल, येथून आपण विहीर गावातून म्हणजेच कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावाजवळून कोथळे या गावात पोहोचतो. हे अंतर साधारणतः २५ कि. मी. च्या आसपास आहे. जर आपण भंडारदरा बघून राजूर ला आलो तर राजूरहून कोतूळ कडे जाणाऱ्यामार्गावर आपल्याला ४१ कि.मी. अंतरावर कोथळे गाव लागते. बस ने देखील हा प्रवास होऊ शकतो.हरिश्चंद्रगड हा या भागातील महत्वाचा किल्ला असल्याने त्याकडे जाणारा मुख्य मार्ग हा टोलारखिंडीतून जातो, या मार्गावर राखण करण्यासाठी म्हणजेच टेहाळणी साठी हा भैरवगड बांधलेला असावा. खिंडीच्या एका बाजूला नगर कडून कोथळे तर पुण्याकडून खिरेश्वर गाव आहे.कोथळे गावात आल्यावर डोंगराचीसुरुवात होते. सर्वात वेगळा आणि छोटा परंतु शिवलिंगासारख्या आकाराचा एक डोंगर दिसतो त्याला कोथळा नावाने संबोधले जाते. पुढे एक शिखर सोडून सपाट असा पठार आहे तो म्हणजे “भैरवगड” आणि त्याच्या लगतचे उंच शिखर म्हणजे “गाढवाचा डोंगर” होय.कोतुळ गावातून कोथळे कडे जाताना कोथळे गावाच्या साधारणतः अर्धा किलोमीटर अगोदर आणि जर राजूर कडून आलात तर कोथळे गावाच्या पुढे एक कच्चा रस्ता टोलार खिंडीकडे जाणार रस्ता आहे. इथे हरिश्चंद्रगड, कळसुबाई अभयारण्य असे फलक आहेत आणि टोलार खिंडीकडे असा बाण देखील दाखवलेला आहे. रस्त्याने पुढे गेल्यावर दोन मिनिटांनी डाव्या हाताला शेतातून मळलेल्या पायवाटेने पुढे जाणार रस्ता आपल्याला दिसतो.आपला प्रवास गडावर सुरू होतो गर्द झाडीतून जाणाऱ्या वाटेने! कितीही थकवा असला तरी झाडांच्या या गर्दीतून तो नक्की नाहीसा होतो.एक २० मिनिटांच्या आल्हाददायक पण खड्या चढाई नंतर आपण गडाच्या पहिल्या कातळकोरीव टप्प्यावर पोहोचतो. या पायऱ्यांच्या डाव्या बाजूला पाण्याचे कातळाखाली एक टाके आहे. हे पाण्याचे टाके बघून आपण पुढे एक वळसा घालून गडाच्या पहिल्या शिडीजवळ येतो.थोडंस अंतर चालून गेल्यावर आपल्याला कातळकोरीव खांब टाके लागते. खांब टाक्यातील पाणी हे पिण्यायोग्य असते. खांब टाक्याच्या बाजूला खाली एक बुजलेल्या अवस्थेतील पाण्याचे टाके आहे. वनविभागाने या जागेवर दोन बाक टाकलेले आहेत.टाक्यापासून पुढे गेल्यावर आपल्याला एक मोठी शिडी लागते. ही शिडी काही प्रमाणात हालत आहे. आधार नसल्याने ही ४० पायऱ्यांची शिडी एकट्यानेच चढावी. ही शिडी चढून गेल्यावर शेवटची छोटी शिडी आपण चढून जायची.गडमाथ्यावर गेल्यावर गडाचा छोटा विस्तार लक्षात येतो. गडाच्या उत्तरेला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला भैरवनाथाचे उघडयावर मंदिर आहे. बाजूलाच काही वीरगळ व मुर्त्या आहेत. समोरच कातळकोरीव दोन पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. भैरवनाथाच्या मूर्तीच्या उजव्या हाताला दोन दीपमाळा आहेत.भैरवनाथाच्या मागच्या बाजूला लोखंडी रेलिंग लावलेले आहेत तिथून आपल्याला हरिश्चंद्रगडाच्या वेताळधारेचे रूप दिसते.भैरवनाथाचे दर्शन घेऊन आपण गडाच्या दक्षिण भागाकडे जायचे. दक्षिणेकडे आपल्याला एक उंच शिखर दिसते. गावकऱ्यांनी एक श्रद्धेने याला गाढव डोंगर म्हणाले आहे. भैरवगड हा भैरवनाथाचा रथ आहे तर हा रथ ओढणारा गाढव आहे अशी अदभुत कल्पना केलेली आहे. गडाच्या दक्षिणेला पाण्याची पाच टाकी आहेत. गाढव डोंगर आणि भैरवगड जिथे एकत्र येतात तिथे आपल्याला तटबंदीचे काही अवशेष बघायला मिळतात, ते बघून आपली गडफेरी पूर्ण होते.