कुलाबा किल्ला (Kolaba Fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

कुलाबा किल्ला

सागरी शत्रूंपासून स्वराज्याचे रक्षण व्हावे याकरिता कोकण किनार पट्टीतील अति महत्वाचा समजला जाणाऱ्या कुलाबा सागरी किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी इ.स. १६८० साली केली होती.अरबी समुद्रालगत असलेल्या कुलाबा किल्ल्याची लांबी ९०० फुट, असून रुंदी ३५० फुट आहे. तसचं, किल्ल्याला तटबंदी असून त्याची उंची २५ फुट उंच आहे. शिवाय, किल्ल्यावर देखरेखीसाठी १७ बुरुजांची निर्मिती करण्यात आली आहे.आज या किल्ल्यावरून ३०० पेक्षा जास्त वर्ष उलटली आहेत तरी, हा हा किल्ला सागरी लाटांची पर्वा न करता अरबी समुद्राच्या किनारी खंबीरपणे उभा आहे.किल्ला समुद्र किनारी असल्याने सागराला येत असलेल्या भरतीमुळे सागराच्या लाटा प्रचंड उसळतात. सागराच्या लाटा उसळत असल्या तरी सुद्धा सागराचे पाणी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारा पासून सुमारे १५ फुटापर्यंत आत येत नाही.किल्ल्याचे बांधकाम पूर्णपणे दगडांचे असून मोठ मोठाले दगड केवळ एकमेकावर रचल्या गेले आहेत. त्यांच्या मध्ये चुन्याचा वापर केला गेला नाही. त्यामुळे समुद्राला येत असलेल्या भरतीच्या लाटांचे पाणी दगडांना छेदते त्यामुळे, पाण्याचा वेग कमी होतो.कुलाबा हा किल्ला पूर्णपणे अरबी समुद्रा लगत असला तरी सुद्धा किल्ल्यावर असलेल्या विहिरीतील पाणी गोड आहे. शिवाय किल्ल्यावर एक गोड्या पाण्याचे सरोवर सुद्धा आहे.

किल्ल्यावर काय पाहाल
छत्रपती शिवाजी महाराजांनी जाल्दुर्गांचे महत्व लक्षात घेऊन इ.स. १६८० साली कुलाबा किल्ल्याची उभारणी केली होती. अलिबाग शहरालगत अरबी समुद्र किनारी असलेल्या कुलाबा किल्ल्याला दोन प्रवेश द्वार असून एक द्वाराचे तोंड समुद्राच्या दिशेने असून दुसऱ्या द्वाराचे तोंड अलिबाग शहराच्या दिशेने आहे.किल्ल्याच्या प्रवेश द्वारावर मोर, हरण, कमळ, शरभ, हत्ती इत्यादी प्रकारची शिल्प कोरल्या गेली आहेत. मुख्य द्वारातून किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यास दुसरा दरवाजा लगतो. तो पार करताच महिषासुराचे दर्शन होते.त्यांच्या बाजूला भवानी मातेचे मंदिर आहे. तसच तेथे पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे. त्याच्यासमोर गेल्यास वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. तेथून डावीकडे जात असलेली वाट हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार यांच्या दर्ग्याकडे जाते.दर्ग्यापासून परतीच्या वाटेवर डावीकडे एकेकाळी किल्ल्याचे शिलेदार असलेल्या आग्र्यांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर आज सुद्धा लोकांचे श्रद्धा स्थान असलेले भगवान गणेश यांचे सिद्धिविनायक मंदिर आहे. मंदिरातील गणेश मूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीडफुट आहे. गणेश भक्त नियमित दर्शनाकरिता या किल्ल्यावर येत असतात.

सिद्धिविनायक मंदिराबाबत अशी माहिती मिळते की, या मंदिराची निर्मिती इ.स. १७५९ साली राघोजी आग्रे यांनी केली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात अष्टभुजा देवी, श्री शंकर, विष्णू, सूर्य यांच्या अतिशय सुंदर मुर्त्या आहेत. या मूर्त्यांच्या एकत्रीकरणामुळे या मंदिराला ‘श्री गणेश पंचयतन’ म्हणून ओळखले जाते.कुलाबा किल्ल्याचा सामावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत केला गेला असला तरी सुद्धा किल्ल्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. योग्य देखभाली अभावी किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्याच्या आतील परिसरात गवताचे साम्राज्य पसरले आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांसाठी किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही.सध्या स्थितीत कुलाबा हा किल्ला पुरातत्व विभागाच्या देखरेखीत असून किल्ल्याची स्वच्छता राखण्यास पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. किल्ल्याच्या भेटीस दरवर्षी लाखो लोक येत असतात. त्याकरिता पुरातत्व विभागातर्फे शुल्क आकारले जाते.किल्ल्याला भेट देण्यासाठी पुरातत्व विभागातर्फे भरती अहोटीचे वेळा पत्रक तयार केले असून समुद्राला आहोटी असतांना आपण या ठिकाणी जावू शकतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu