बेलापूरचा किल्ला(Fort of Belapur)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

बेलापूरचा किल्ला

इतिहास
पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १९३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला. पानिपत युध्दानंतर सदाशिवभाऊच्या तोतयाला मानाजी आंग्रेनी बेलापूरच्या किल्ल्यात पकडले. इंग्रज कर्नल के याने २३ नोव्हेंबर १७७८ रोजी बेलापूर किल्ला जिंकून घेतला. १७७९ मध्ये वडगावच्या तहानुसार इंग्रजांना किल्ल्याचा ताबा मराठ्यांना परत द्यावा लागला. १२ एप्रिल १७८० रोजी कॅप्टन कॅम्बेलने बेलापूरचा किल्ला परत जिंकला; पण १७८२ च्या तहानुसार इंग्रजांना परत हा गड मराठ्यांना द्यावा लागला. २३ जून १८१७ रोजी कॅप्टन चार्ल्स ग्रे याने हा किल्ला जिंकून इंग्रज साम्राज्यात समाविष्ट केला.१७३३ मध्ये चिमाजी अप्पाच्या नेतृत्वात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून किल्ल्यावरील ताबा मिळविला. पोर्तुगीजांकडून यशस्वीरित्या किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यात आल्यास त्यांनी जवळच्या अमृतैश्वर मंदिरात बेलीच्या पानांचा हार घालेल असा प्रण केला आणि विजय मिळाल्यावर त्यांनी किल्ल्याला बेलापूर किल्ला असे नामकरण केले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन चार्ल्स ग्रेन याने २३ जून १८१७ रोजी ताब्यात घेईपर्यंत मराठ्यांनी या प्रदेशावर राज्य केले. ब्रिटीशांनी त्यांच्या परिसरातील कुठलाही मराठ्यांच्या वर्चस्वाखाली असलेला गड मोडून काढण्याच्या धोरणाखाली हा किल्ला अर्धवट नष्ट केला.त्याच्या सक्रिय दिवसांमध्ये, किल्ल्यात चार तुकड्या प्रत्येकी १८० माणसांच्या आणि ४-१२ पौंड (२-५ किलो) वजनाच्या १४ बंदुका ठेवल्या होत्या. ह्या किल्ल्यात एक बोगदा देखील अस्तित्त्वात आहे असे मानले जाते, जो अनेक स्थानिकांच्या मते ते घारापुरी बेटाशी जोडले गेला आहे, जे एलिफंटा लेण्यांचे ठिकाण आहे.

पहाण्याची ठिकाणे
बेलापूरचा किल्ला ज्या खाडीकाठी उभा होता त्यात भराव टाकून इमारती बांधल्यामुळे किल्ल्याचे थोडेच अवशेष शिल्लक राहीले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या बागेच्या मागे किल्ल्याचा एकूलता एक बुरुज उभा आहे. बुरुजाच्यावर जाण्यासाठी आतल्या बाजूने गोलाकार जिना आहे. किल्ल्याची तटबंदी अस्तित्वात नाही, पण बालेकिल्ल्यावर इमारतीचे अवशेष व दुमजली गोल मनोरा दिसतो. किल्ल्याची देवी गोवर्धनी मातेचे जिर्णोध्दार केलेल मंदिर सध्या इमारतींच्या गराड्यात आहे. या शिवाय रेतीबंदर जवळ दोन चौकोनी विहीरी व पोर्तुगिजकालीन तलाव आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu