बहादरपूर किल्ला (Bahadurpur Fort)
Like
Like Love Haha Wow Sad Angry

बहादरपूर किल्ला

बहादरपूर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला जळगाव जिल्ह्यात आहे.पारोळा व अंमळनेर या शहरांच्या मध्ये बोरी नदीच्या काठावर बहादरपूर किल्ला उभा आहे. १५ व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याचे अंदाजे ४० फूट उंच बुलंद व बलाढ्य बुरुज आजही काळाशी झुंज देत उभे आहेत. इतके बुलंद व सुंदर बुरुज फारच कमी ठिकाणी पाहायला नदीच्या पात्रापासून तटबंदीची उंची २० फुट आहे. दुसर्या बुरुजाचा तटबंदी पर्यंतचा भाग शाबुत आहे. या बुरुजाजवळ एक कबर आहे. किल्ल्यावरील फारशी/अरबीतील शिलालेख ग्रामपंचायतीत आहे. गडाचा गावाच्या बाजूला असलेला भाग अतिक्रमणामुळे उध्वस्त झालेला आहे.
मिळतात.

इतिहास
इ.स. १५९६ मध्ये बहादुरखान सूरी याने हा किल्ला बांधला. इ.स. १७५१ मध्ये नानासाहेब पेशवे व गायकवाड यांच्यात बहादरपूर येथे बोरी नदीच्या तीरावर लढाइ झाली. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला पेशव्यांकडून जिंकून घेतला. पारोळ्यापासून बहादूरपूर ८ किमी अंतरावर आहे. पारोळा अंमळनेर रस्त्यावर बहादरपूर फाटा आहे. याशिवाय धुळे – जळगाव रस्त्यावर मोंढाणे गावाजवळ बहादरपूरला जाणारा फाटा आहे. तेथून बहादरपूर १० किमी अंतरावर आहे. जळगाव जिल्ह्य़ात गडकोट तसे कमीच आहेत व जे आहेत ते हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आणि भुईकोट. अशाच भुईकोटापैकी एक कोट म्हणजे बहादरपूर किल्ला. १९०६ पुर्वी हल्लीचे जळगाव व धुळे या दोन जिल्ह्याचा मिळून एकच खानदेश जिल्हा होता.या खानदेशात पारोळा व अंमळनेर या शहरांच्या मध्यवर्ती बोरी नदीच्या काठावर बहादरपूर किल्ला उभा आहे. पारोळा व अंमळनेर या दोनही ठिकाणी असणाऱ्या भुईकोटाना रसद पुरविण्याचे काम बहादरपूर किल्ला करत होता.

बहादरपूर किल्ला नगरकोट व बालेकिल्ला अशा दोन भागात विभागलेला असुन कोटात असणाऱ्या ५० फुट उंचीच्या टेकडावर बालेकिल्ला उभा आहे. चौकोनी आकाराच्या या बालेकिल्ल्याची लांबीरुंदी २५० x १५० फूट असुन बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण एक एकर आहे. तटबंदीत चार बाजूला चार गोलाकार बुरुज असुन एका ४० फूटी भल्या मोठया बुरुजाचा आतील भाग झाडामुळे ढासळून आहे व बाहेरील भाग शिल्लक आहे. गडाचा गावाच्या बाजूला असलेला भाग अतिक्रमणामुळे झाकला गेला आहे. किल्ल्याची देखरेख नसल्याने स्थानिक आजही या किल्ल्याचा शौचालय म्हणुन वापर करतात. बोरी नदीच्या पात्रातुन उजव्या बाजुस बालेकिल्ल्याची २५० फुट लांब तटबंदी व त्यातील दोन बुरुज दिसतात.नदीच्या पात्रापासून तटबंदीची उंची २० फुट असुन यातील एक बुरुज अंदाजे ४० फूट उंच आहे. दुसऱ्या बुरुजाचा तटबंदी पर्यंतचा भाग शिल्लक असुन या बुरुजावर एक कबर आहे. किल्ल्यावरील पर्शियन भाषेतील शिलालेख ग्रामपंचायतीत ठेवलेला आहे. स्थानिक लोकांच्या अनास्थेमुळे किल्ल्याची अवस्था फारच वाईट झाली आहे. गावाच्या एका बाजूस बोरी नदीपात्राचे असलेले नैसर्गिक संरक्षण अधिक भक्कम करण्यासाठी नदीच्या बाजूस तटबंदी व बुरुज बांधण्यात आले होते ते आजही दिसून येतात. शहराच्या उरलेल्या बाजूला दरवाजे, तटबंदी व बुरुज बांधून संरक्षित केले होते. गावात फेरी मारली असता अनेक ठिकाणी तटाबुरुजाचे व वाड्याचे अवशेष दिसून येतात.

पुर्वी गावाला चारही बाजूंनी तटबंदी असुन तटबंदीत दरवाजे असल्याचे गावकरी सांगतात. ही ढासळलेली तटबंदी आजही अनेक ठिकाणी दिसून येते. गावात बऱ्याच घराबाहेर दगडी तोफगोळे पडलेले दिसतात. गावाबाहेर अजुन एक लांबीरुंदीने ७०० x ३०० फुट आकाराची चारही बाजुस तटबंदीने बंदिस्त केलेली वास्तू आहे. या वास्तूत एक दगडी बांधकामाची मशीद असुन तीन सुरेख दगडी बांधकाम असणाऱ्या वास्तू आहेत. यातील एका वास्तूत पाच कबरी असुन दुसऱ्या वास्तूत दोन कबरी आहेत. या तीनही वास्तूंच्या खाली तळघरे आहेत. एकंदरीत बांधणीवरून या राजघराण्यातील महत्वाच्या व्यक्तींच्या कबरी असाव्यात असे दिसते. हे ठिकाण आपल्याला अलिबागच्या आंग्रे घराण्याच्या छत्रीबागेची आठवण करून देते. बहादरपूर किल्ला पाहताना हे ठिकाण अवश्य पहायला हवे. किल्ल्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध असुन इ.स. १५९६ मध्ये बहादुरखान सूरी याने हा किल्ला बांधला. १७५१साली नानासाहेब पेशवे व गायकवाड यांच्यात बहादरपूर येथे बोरी नदीच्या तीरावर लढाइ झाली. इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीश कर्नल हस्कीन्सन याने अंमळनेर कोटावर हल्ला करण्यापुर्वी त्या गडाची रसद बंद करून नाकेबंदी करण्यासाठी प्रथम हा किल्ला पेशव्यांकडून जिंकून घेतला.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu