अंमळनेरचा किल्ला (Amalner Fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

अंमळनेरचा किल्ला

अंमळनेर हे बोरी नदीकाठी वसलेले जळगाव जिल्ह्यातील मोठे शहर आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी नगरदूर्ग होता; म्हणजे शहराला तटबंदी व बुरुज बांधून संरक्षित केलेले होते. या शहराच्या एकाबाजूस बोरी नदीचे पात्र असल्यामुळे नैसर्गिक संरक्षण होते. ते भक्कम करण्यासाठी नदीच्या बाजूस ही तटबंदी व बुरुज बांधण्यात आले होते. शहराच्या उरलेल्या तीन बाजूस ३ दरवाजे व २० फुटी तटबंदी होती.इतिहासअंमळनेर हा नगरदूर्ग कोणी व कधी बांधला याचा इतिहास उपलब्ध नाही. इस १८१८ मध्ये हा किल्ला पेशव्यांचा प्रतिनिधी माधवराव यांच्या ताब्यात होता. पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे माधवरावाने किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात देण्याचे ठरविले,पण किल्ल्याचा जमादार अली व त्याच्या हाताखालची अरब फलटण यांनी या गोष्टीला विरोध केला. ब्रिटीश कर्नल हस्कीन्सन मालेगावहून भिल्ल बटालीयन घेऊन अंमळनेरवर चालून आला. त्याने नदीच्या पूर्वेकडून किल्ल्यांवर तोफांचा मारा केला. अली जमादार व त्याच्या सैन्याने प्रयन्तांची शर्त केली. पण ब्रिटीशांनी चारही बाजूंनी त्यांची कोंडी केली होती. दक्षिणेकडील बहादरपूर किल्ल्यावरुन येणारी रसद (व दारुगोळा) ब्रिटीशांनी तो ताब्यात घेतल्यामुळे बंद झाली त्यामुळे अली जमादार व त्याच्या सैन्याने नदीच्या पात्रातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयन्त केला, पण ते सर्वजण इंग्रजांचे कैदी बनले.

पहाण्याची ठिकाणे:
अंमळनेर हा नगरदूर्ग होता. आता या शहराची वाढ झाल्यामुळे मुळच्या किल्ल्यावर त्याने अतिक्रमण केले आहे. अंमळनेर शहरातच किल्ल्याचा २० फूट उंच बुलंद दरवाजा व त्याबाजूचे भक्कम बुरुज उभे आहेत. या दरवाजाखालून जाणारा रस्ता बोरी नदी काठावरील संत सखाराम महाराजांच्या समाधी मंदीराकडे जातो. या बाजूने बोरी नदीच्या पात्रात उतरल्यावर किल्ल्याची तटबंदी व त्यावर स्थानिकांनी चढवलेली घरे दृष्टीस पडतात. उजव्या हाताला एक बुरुज दिसतो. नदीवरुन प्रवेशद्वाराकडे परत येताना रस्त्यात देशमुखांचे लाकडी नक्षीकाम असलेले सुंदर दुमजली घर आहे.

गडगा नदीच्या काठावरुन अंमळनेर किल्ल्याचे सुरेख दर्शन घडते. या किल्ल्याला अंमळनेर हे नाव जवळ असलेल्या अंमळनेर गावावरुन मिळाले आहे. हे अंमळनेर गाव ब्रिटीश आमदनीत उठून गेले. गाव उठून गेल्यामुळे त्या गावाची वाटही मोडून गेलेली आहे.गडगा नदी ओलांडून गेल्यावर डावीकडे किल्ल्याचा ढासळत चाललेला बुरुज आपल्याला दिसतो. या बुरूजाकडे चढणाऱ्या वाटेने थोडेसे चढल्यावर उजवीकडे असलेल्या तटबंदीवर चढण्यास वाट आहे. या तुटक्या तटबंदीमधून गड प्रवेश होतो.गडाच्या मध्यभागी मारुतीचे लहान मंदिर आहे. त्यामागे वाड्याचे मोठे जोते शिल्लक असून त्याला मोठे तळघर आहे. चौकोनी आकाराच्या या छोट्याशा आटोपशीर किल्ल्याचे क्षेत्रफळ अगदी कमी आहे. त्यातूनही आत असलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत.या किल्ल्यास ८ बुरुज असून त्यापैकी ७ शाबुत आहेत. नदीतील पाण्याच्या माराने एक बुरुज भग्न झाला आहे.काळ्या पाषाणात वितळविलेले शिसे ओतुन याचा पाया मजबुत करण्यात आलेला आहे.यात जोडांसाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला आहे.हा किल्ला १२व्या ते १३व्या शतकापासुन अस्तित्वात असावा. तीनही बाजुस पाणी आणि एका बाजुस खंदक अशी या किल्ल्याची रचना आहे.या किल्ल्यावर शिवाचे मंदिर आहे. यास सोमेश्वर म्हणतात.सन १७६९ साली या किल्ल्यावर पेशव्यांचा मुक्काम झाला होता असे इतिहासकार सांगतात.गुप्तधनाच्या आशेने अनेक ठिकाणी खोदकाम केलेले दिसते. गडाचा मुख्य मार्ग उत्तराभिमुख असून त्या मार्गावरील दरवाजा नष्ट झाला आहे. तटबंदीही बरीचशी ढासळलेली आहे. चार कोपऱ्याला चार आणि मधे दोन दोन बुरुज मिळून किल्ल्याला एकंदरीत बारा बुरुज आहेत. तापी आणि गडगाच्या संगमाकडील बुरुजावरुन नदीचे उत्तम दर्शन होते. या बुरुजाच्या आतील बांधकामामध्ये राहण्याची सोय केलेली दिसते. याच तटबंदीमध्ये तापीनदीकडे जाणाऱ्या मार्गावर एक दिंडी दरवाजा आहे. ती वाट मोडल्यामुळे अवघड झालेली आहे.अंमळनेर किल्ला नेमका कोणी व केव्हा बांधला याबाबत इतिहास कळत नाही. बाहेरुन सुरेख दर्शन देणारा हा किल्ला आतून मात्र मरणपंथाला लागलेला दिसतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




2 Comments. Leave new

  • Thanks for sharing valuable infomation .

    Reply
  • हरीष देशमुख
    05/12/2022 2:16 PM

    पहाण्याची ठिकाणे सदरातील, दुसऱ्या पॅराग्राफ मधील माहिती चुकीची आहे.
    वर्णन केल्याप्रमाणे काहीही सद्यपरिस्थितीत दिसत नाही.
    तत्कालीन किल्ल्याची तटबंदीच केवळ शिल्लक आहे,ज्यावर लोकांनी आपली घरे बांधली आहेत.
    मी मुळ अमळनेरच्या देशमुख घराण्यातील असुन मी पुण्यात पुराभिलेखागारात अमळनेरच्या इतिहासावर अभ्यास करीत आहे.
    इंग्रज काळातील किल्ल्याचा नकाशा ही इंटरनेटवर उपलब्ध आहे.

    तरी आपण दिलेल्या माहितीत योग्य तो बदल अपेक्षित आहे.

    Reply

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा