साहित्य – ½ किलो चिकन ब्रेस्ट, काळीमिरी पूड, 3 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर.
कृती -: चिकन ब्रेस्टचे उभे तुकडे करुन घ्या. त्यात मीठ, काळीमिरी पूड, कॉर्नफ्लोर घालून छान मिक्स करुन घ्या.तेरीयाकी चिकनवर एक छान ग्लेझ असतो. त्यासाठी आधी चिकन शिजवून घ्यावे लागेल. एका ट्रेमध्ये मॅरिनेट केलेले चिकन घ्या. त्यावर तेलाचा किंवा बटरचा ब्रश फिरवा.ओव्हन 200 डिग्रीवर 5 मिनिटांसाठी प्रीहिट करुन घ्या. चिकन साधारण 15 मिनिटे तरी शिजवा.तेरीयाकी चिकनमध्ये सोया सॉसची ग्रेव्ही असते.एका पॅनमध्ये बॉटममध्ये लसूण, सोया सॉस, पाणी, 1 चमचा मध आणि कॉर्नफ्लोअर घालून एकत्र करुन घ्या.एका मायक्रोव्हेव पॅनमध्ये चिकनचे शिजवलेले तुकडे घेऊन त्यावर ही सोयासॉसचे पाणी घाला.मायक्रोव्हेवमध्ये हे मिश्रण तुम्हाला किमान 20 मिनिटांसाठी ठेवायचे आहे. तुम्हाला याची ग्लेझी आणि थीक ग्रेव्ही येईपर्यंत ठेवायचे आहे.
टिप: पॅनमध्येही हे चिकन करता येते. पण तुम्हाला मायक्कोव्हेवमध्ये छान टेंडर चिकन मिळते.