पेश्वरी वांगी
Like
Like Love Haha Wow Sad Angry
 पेश्वरी वांगी Marathi Recipe

साहित्य – ८-१० छोटी वांगी,२ वाट्या कांदा (किसून किंवा बारीक चिरुन),२ छोटे चमचे तिखट,१ छोटा चमचा धणेपूड, दालचिनी, लवंग, वेलची यांची पूड प्रत्येकी अर्धा चमचा,४ छोटे चमचे खसखस- वाटून,१ छोटा चमचा हळद,१ छोटा चमचा वाटलेला लसूण १ छोटा चमचा वाटलेले आले,१ वाटी दूध,अर्धी वाटी दही,अर्धी वाटी खवा (मावा पावडर चालेल),पाव वाटी काजूचे तुकडे (ऐच्छिक).

कृती -:  – एक मोठे भांडे, कढई वा पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये २ चमचे तेल घालून गरम होऊ द्यावे.
– वांगी धुवून, पुसून त्यांना + अशी चीर देऊन ती या तेलात थोडी परतून घ्यावी. बाहेर काढून ठेवावी.
– याच भांड्यात उरलेले तेल घालावे.
– गरम झाल्यावर त्यात २ वाट्या कांदा घालून चांगले परतावे, मग खवा (मावा पावडर) घालून परतावे.
– यानंतर त्यात हळद, आले-लसूण पेस्ट, मीठ, तिखट, साखर, लवंग-दालचिनी-वेलची पूड घालावी.
– वाटलेली खसखस व काजूचे तुकडे घालून परतावे.
– मग एक वाटी दूध आणि अर्धी वाटी दही(फेटून एकजीव केलेले) घालावे.
– १-२ मिनिटे परतावे.
– नंतर वांगी घालावीत आणि ४-५ मिनिटे परतावे.
– मग यात दीड वाटी गरम पाणी घालून झाकण देऊन वांगी शिजवावी.
– वरुन  चिरलेली कोथिंबीर, पुदिना घालून वाढावे.
– चपाती, नान, बासमतीचा भात याबरोबर छान लागते. ग्रेव्ही दाटच असते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu