पालक कबाब- Marathi Recipe




Like
Like Love Haha Wow Sad Angry
पालक कबाब- Marathi Recipe

साहित्य – पालकाची एक जुडी , ४ मोठे बटाटे , पुदिना , कोथिम्बीर , हिरव्या मिरच्या , एक वाटी मूग डाळ, भिजवून आले लसूण पेस्ट, धणे ,जीरे पावडर , गरम मसाला , मीठ चवीपुरती साखर , काजू.

कृती -: 1. बटाटे उकडून किसून घ्यावेत. 2.पालक धुवून मिक्सर मधे २ चमचे पाणी घालून बारीक वाटून घ्यावा. 3.पुदिना, कोथिम्बीर, मिरच्या बारीक चिरावे. 4.भिजवलेली डाळ वाटावी व सगळे मिक्स करावे. या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावेत व थोडे चपटे करावेत. 5.प्रत्येक काजूचे उभे २ तुकडे करावेत. एक तुकडा प्रत्येक कबाबच्या मधे बसवावा म्हणजे शोभा येते. हे तयार करुन अर्धा तास फ़्रीज मधे ठेवावे . नंतर आयत्या वेळी तळावेत. (शॅलो फ्राय केले तरी चालतात, वरुन रवा  ब्रेडकम्स असे काही लावावे लागत नाही.) पालकाचा हिरवा रंग आणि वरुन लावलेले काजू यामुळे हे कबाब छान दिसतात आणि लागतात पण. कांदा व लिंबू याबरोबर सर्व्ह करावे व वरुन थोडा गरम मसाला भुरभुरावा.पालक चिरुन, किंवा चॉपरमधून कापून मुगाची वाटलेली डाळ, याहून जास्त पातळ नको.बटाटा, पालक, इतर जिन्नस मिक्स केलेले-गोळा करुन फ्रीजमध्ये ठेवले (कबाब बनवूनच फ्रीजमध्ये ठेवू शकता)मग कबाब बनवून ग्रिडलवर शॅलो फ्राय केले. पॅनवरही तेल टाकून करता येतील. प्रत्येक कबाब पॅनच्या बाजूला टेकवून किंवा उभा फिरवून बाजूला थोडी आच लागू द्यावी.

अधिक टिपा: 

पालक पाणी न घालता chopper मधे बारीक करुन घेता येतो. मुगाची डाळ पटकन भिजते. गरम पाण्यात टाकली तर अगदी १५ मिनिटात. ती पण फार बारीक वाटू नये. पुदिना ऐवजी मी चाट मसाला घातला २ लहान चमचे. मग वरुन गरम मसाला टाकला नाही. खरपूस शॅलो फ्राय करावेत. कान्दा, लिम्बू तसंच आंबटगोड चटणीबरोबरही छान लागले.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu