मोहनथाळ बर्फी




Like
Like Love Haha Wow Sad Angry
मोहनथाळ बर्फी – Marathi Recipe

साहित्य – अर्धा किलो चण्याची डाळ, ४०० ग्रॅम साखर, ३०० ग्रॅम मावा, १५० ग्रॅम साजूक तूप, १५ वेलची दाणे, १० काजू, १० बदाम, अर्धा कप दूध, चवीसाठी दूध मसाला (छोटी डबी).

कृती -:  प्रथम अर्धा किलो चण्याची डाळ चक्कीवर दळून आणावी. त्यानंतर परातीमध्ये चण्याच्या डाळीचं पीठ घेऊन त्यात अर्धा कप दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. नंतर मिश्रणावर झाकण ठेवून सुमारे एक तास ठेवून द्यावं. एक
तासानंतर मिश्रणातील गुठळ्या हाताने व्यवस्थित फोडून घ्या. मग हे मिश्रण चाळणीने चाळून घ्यावं. नंतर गॅसवर पितळेच्या कढईत १०० ग्रॅम साजूक तूप घालून मध्यम आचेवर गरम करावं. तूप गरम झाल्यानंतर त्यात चण्याच्या डाळीचं पीठ घालून कालथ्याने व्यवस्थित भाजून घ्यावं. पीठ भाजलं की एका ताटात काढून घ्या. पुन्हा कढईत ५० ग्रॅम साजूक तूप गरम करत ठेवा. त्यात ३०० ग्रॅम मावा, ४०० ग्रॅम साखर, एक चमचा दूध व बारीक केलेली वेलचीपूड घालून, मिश्रणाचा पाक होईपर्यंत कालथ्याच्या सहाय्याने सतत ढवळत राहा. मिश्रणाचा पाक झाल्यानंतर भाजलेलं पीठ पाकात घालून सुमारे १० मिनिटं मध्यम आचेवर एकजीव होईपर्यंत घोटत राहा. १० मिनिटांनी गॅस बंद करा. मग परातीला साजूक तूप लावून घ्या. नंतर कढईतील पिठाचं मिश्रण परातीत ओतून वाटीच्या साहाय्याने व्यवस्थित एकसमान पसरवा. मग त्यावर दूध मसाला, काजू-बदामचे तुकडे पसरवून, वाटीच्या साहाय्याने व्यवस्थित थापून घ्या. हे मिश्रण सुमारे तासभर पंख्याखाली ठेवा. मिश्रण व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपल्या आवडीच्या आकाराचे तुकडे पाडून मोहनथाळचा आस्वाद घ्या. बघा किती सोप्पं आहे, मिठाईच्या दुकानात मिळणारं मोहनथाळ घरच्या घरीच बनवणं.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu