मेथी कोपता करी -Marathi Recipe
Like
Like Love Haha Wow Sad Angry
मेथी कोपता करी – Marathi Recipe

साहित्य – १ ) मेथीची एक जुडी
२) दीड वाटी बेसन
३) ओवा दोन चमचे
४) चिमुटभर खाण्याचा सोडा
५) लाल तिखट
६) गरजेनुसार मीठ

कोफ्ते :
१ ) सुरुवातीला मेथीची भाजी बारीक चिरून , बेसन आणि ओवा , लाल तिखट , मीठ , खाण्याचा सोडा एकत्र करून भिजवून घ्या .
२) हाताने गोळे करून त्यांना तेलात सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या.

करी साठी लागणारे साहित्य : कांदे , आले-लसुन पेस्ट ,दही , भाजलेलं खोबरे , चिरून घेतलेला टोमाटो . वेलची ,गरम मसाला , दालचिनी , मीठ , हळद , कोथम्बीर . तेल , थोडस पनीर (आवडीनुसार सजावटीसाठी ) , धने .

कृती -: करी
१) कांदा बारीक चिरून थोडासा भाजून घ्या .
२) त्यानंतर खोबरे , खसखस , दालचिनी , गरम मसाला , जिरे , धने , आले लसुन पेस्ट टाकून मिक्सर मध्ये टाकून पेस्ट बनवून घ्यावी .
३) एका भांड्यामध्ये तेल टाकून हळद आणि मसाला टाकून त्यामध्ये मिक्सर मध्ये बनवून घेतलेली पेस्ट टाका .
४) लालसर रंग झाला कि यामध्ये टोमाटो , लाल तिखट ,दही टाकून परतून घ्या यामध्ये त्यानंतर गरजेनुसार पाणी आणि मीठ टाका .
५) ग्रेव्ही तयार झाली कि यामध्ये आधी बनवून घेतलेले कोफ्ते टाकावे . सजावटीसाठी कोथिंबीर आणि पनीरचा वापर करू शकतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu