साहित्य – २ वाट्या मैदा, चांगले पिकलेले अर्धे केळे, एक डाव मोहन, दोन वाट्या साखर, तळणासाठी तेल, चिमुटभर केशर, अर्धा टी स्पून वेलदोड्याची पूड, मुठभर पिस्ते/काजू/बदामाचे काप.
कृती -: मैद्यात डावभर तेलाचे मोहन घालावे. त्यातच केळे चांगले कुस्करुन घालावे. पाणी घालुन भज्याच्या पीठाप्रमाणे भिजवावे. १५-२० मिन. झाकुन ठेवावे. हे झाले पुव्याचे पीठ.एका भांड्यात साखर घ्यावी. साखर जेमतेम बुडेल इतके पाणी घालुन एक उकळी काढावी व बाजुला ठेवावे. त्यात केशर, वेलदोड्याची पूड, सुकामेव्याचे काप घालुन हलवावे.एका कढईत पुवे तळायला तेल गरम करुन घ्यावे. तेल तापल्यावर मोठ्या पळीत पीठ घेऊन पळी गोल गोल फिरवत पुरीच्या आकारात पीठ कढईत सोडावे. मंद आचेवर पुवा दोन्ही बाजूंनी गुलाबी रंगावर तळुन घ्यावा. तेल नीट निथळुन मग पाकात घालावा. दुसरा पुवा तयार झाला की आधी पाक निथळुन पहिला काढुन घ्यावा.
अधिक टिपा:
सुकामेवा, केशर इत्यादी माल माल घालतात म्हणुन ह्याला मालपुवा म्हणतात. पीठातच साखर घालुन जे करतात ते नुसते पुवे.
ह्या मालपुव्यावर आणखी रबडी घालुन खातात. बिहारमधे मालपुवे आणि दाट घट्ट रबडी हा होळीचा खास मेनु असतो.