कोणताही सण आला की नक्की घरी काय बनवायचं असा प्रश्न निर्माण होतो. मग इतका घाट कशाला घालायचा चला बाहेरूनच काहीतरी विकत आणू असंही ठरतं. पण वेळ वाचवून तुम्ही घरच्या घरी अगदी 15 मिनिट्समध्ये झटपट रव्याचे गुलाबजाम नक्कीच करू शकता. हे करण्यासाठी ना जास्त वेळ लागत ना खर्च. बाहेरून काहीतरी गोडधोड पदार्थ आणण्यापेक्षा घरच्या घरी केलेल्या गोड पदार्थांना एक वेगळीच आपुलकी असते आणि गोडवाही. अगदी सणासुदीला नाही पण घरातही कधीतरी भाजी अथवा अन्य गोष्टी खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही असे रव्याचे गुलाबजाम करून खाऊ शकता आणि तुमच्या घरच्यांनाही खुष करू शकता.आपण या लेखातून हे रव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे आहेत ते जाणून घेणार आहोत. तसंच हे गुलाबजाम करणं अतिशय सोपं आहे. खरं तर गुलाबजाम करायचे म्हटलं की ते खूपच कठीण काम वाटतं पण तसं अजिबात नाही. तुम्हाला अगदी पटकन हे करून त्याचा आस्वाद घेता येतो. जाणून घेऊया कसे करायचे गुलाबजाम.
साहित्य – १/२ कि. खवा, २ सपाट वाट्या बरिक रवा, १ चमचा बेकिंग पावडर, पाऊण कि. साखर, दुध, वेलची पावडर, तुप्/रिफांईंड तेल.
कृती -: रवा दुधात कणिकेप्रमाणे मळुन ठेवणे.तासा-दिडतासानंतर रवा आणि खवा फुडप्रोसेसर मधुन फिरवुन घेणे. त्यात बेकिंग पावडर टाकुन चांगले फिरवुन घेणे. (फुडप्रोसेसर नसेल तर पुरणयंत्रातुन काढले तरी चालते.)बाहेर काढुन हाताने पण जरा मळुन घेणे. (जास्त मळलेले चांगले) नंतर गोळे करुन तुपात किंवा रिफाईंड मध्ये तळणे.
पाक – साखर बुडेल एवढे पाणी घालुन कच्चा पाक करावा. त्यात वेलची-जायफळ पुड घालावी.
अधिक टिपा: गोळे करताना साखरेचा एक दाणा त्या गोळ्यात घातला की गुलाबजामला रंग छान येतो.