गुजराती कढी
Like
Like Love Haha Wow Sad Angry
गुजराती कढी – Marathi Recipe

साहित्य – २०० ग्राम अमूल कढी दही किंवा ताजे ताक , 2 टेबल स्पून बेसन , 1 कप पाणी , 1 टेबल स्पून आलं-मिरची ठेचा , 5-6 कडीपत्ताची पाने , 1 टेबल स्पून साखर किंवा गुळ , 2 टेबल स्पून चिरलेली कोथिंबीर , चवीनुसार मीठ.
फोडणीसाठी साहित्य: 2 टेबल स्पून शुध्द तुप , 1 टी स्पून जीरे , 1/2 टी स्पून हिंग , 2 लाल सुक्या मिरच्या.
कृती -:  प्रथम एका भांड्यात कढीचे दही किंवा ताजे ताक घेऊन त्यात बेसन आणि थोडे पाणी घालून चांगले ब्लेन्ड करावे.मग त्यात कडीपत्ताची पाने, आलं-मिरची ठेचा, चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण मध्यम आचेवर उकळायला ठेवावे. दुसरीकडे फोडणीच्या पळीमधे शुध्द तुप, हिंग, जीरे व सुकी मिरची यांची फोडणी करुन गरम कढीवर ओतावी व कढीच्या भांड्याखालील गॅस बंद करावा.कोथिंबीर गार्निश करुन गरमा गरम कढी… जाड भाकरी, पुलाव किंवा खिचडी सोबत सर्व्ह करावी.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu