साहित्य – ३ वाटी तांदूळ,१ वाटी उडीद डाळ,१/२ वाटी चणा डाळ,२चमचे मेथी दाणे, १/४वाटी दही ,१ वाटी किसलीली दुधी,१/४वाटी चिरलेली कोथिंबीर, २ चमचे आले-लसूण्-मिरची पेस्ट,कडीपत्ता,मीठ,३ चमचे साखर, १/४ चमचा हळद,१/२ चमचा मीरपूड,१/२ चमचा तीखट,३ चमचे तीळ, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जीरे, १/४ चमच हिंग, १ चिमूट सोडा.
कृती -: तांदूळ-डाळी-मेथी दाणे ५ते६ तास भिजवून, धुवून वाटून घेणे.त्यात दही टाकून किमान ८ते१० तास मिश्रण फरमेंट करणे. त्यानंतर त्यात दुधि, कोथिंबीर, मीठ, साखर, मीरपूड, आले-लसूण- मिरची पेस्ट घालून व्यवस्थित हलवून घेणे.१चमचा तेल गरम करून मोहरी,जीरे, कडिपत्ता, हळद, हिंग,दीड चमचा तीळ,ति़खट टाकुन फोडणी करणे व ती तयार मिश्रणात घालणे. चिमूटभर सोडा टाकून हलवणे. हे मिश्रण आता हांडवा करण्यास तयार. नॉनस्टिक कढई मधे १ चमचा तेल गरम करून त्यात थोडे तीळ घालावेत व त्यावर लगेच ३ डाव मिश्रण ओतुन कढईवर झाकण ठेवावे.कढई छोट्या गॅसवर एकदम सिम वर ठेवावी व ८ते १० मिनीटाने हांडव्याची खालची बाजू गोल्डन ब्राऊन रंगावर क्रिस्पी भाजून घ्यावी. नंतर हळूवारपणे चमच्याने हांडवा उलटवून दुसरी बाजू परत ७/८ मिनीटे भाजून घ्यावी. थोडेसे गार झाल्यावर त्याचे स्क्वेअर तुकडे करणे.
अधिक टिपा:
हांडवा गरम गरम जास्त छान लागतो. त्यात गाजर, मटार ई. पण घालू शकता.