साहित्य – १. अर्धा किलो गाजर , २. १ पाव हिरवी मिरची , ३. अर्धी वाटी मिठ , ४. पाव वाटी मोहरी डाळ , ५. ४ चमचे मोहरी , ६. २ चमचे हिंग , ७. ४ वाटी तेल , ८. १ वाटी किसलेला गुळ , ९. २ मोठ्या लिंबाचा रस , १०.२ चमचे हळद.
कृती -: १. गाजर छिलुन त्याच्या लांब उभ्या फोडी कराव्या. हिरव्या मिरचीच्या सुद्धा लांब उभ्या फोडी कराव्या.२. गाजर मिरचीला एकत्र करुन त्यात अर्धी वाटी मिठ टाकावे. (मी हे मिश्रण रात्रभर मुरत घातले त्यामुळे त्याला पाणी सुटले ज्याचा लोणच्याचा रस तयार झाला. ) ३. दुसर्या दिवशी तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग व मोहरीच्या डाळीची फोडणी द्यावी. ४. तेल थंड होईस्तोवर गाजर मिरचीच्या मिश्रणात हळद, लिंबु व गुळ घालुन एकत्र करावे.५. थंड तेलाची फोडणी घालुन निट एकत्र करुन लगेच खायला घ्यावे.
अधिक टिपा:
१. हे लोणचं वर्षभर टिकेल कि नाही माहिती नाही. आमच्याकडे एक दोन महिन्यातच रपातपा होतं.
२. गाजर मिरचीच्या मिश्रणाला पाणी सुटु द्यायच नसल्यास रात्रभर मुरत ठेवु नये.
३. गुळ ऑप्शनल आहे.
४. वर लागणारा वेळ मधे दिडदिवस/२ दिवस असा ऑप्शन नसल्याने ३ दिवस असे सिलेक्ट केले आहे