बालूशाही हा एक गोड पदार्थ आहे. बालुशाहीला बाबुशा किंवा कुरमी असेही म्हणतात. बालुशाही बाहेरून हलकी व कडक असते. व आतून एकदम नरम असते. सामान्यतः बालुशाही खाल्ल्यावर आपल्या तोंडात ती विरघळून जाते. चला तर बनवू या बालुशाही…ही बालुशाही नेहमीप्रमाणे दही आणि मैदा मिक्स न करता त्यामध्ये बेसन पीठ मैदा एकत्र करून केलेली आहे त्यामुळे ती मस्त खुसखुशीत होते आणि जास्त दिवस टिकते.
साहित्य – ६ कप मैदा,८ कप साखर,बालुशाही तळायला शुद्ध देशी तूप,६ चम्मच शुद्ध देशी तूप,खाण्याचा सोडा: चिमुटभर,दही किंवा ताकः २०० मिली किंवा एक पेला.
पाक
१. साखर भिजेल इतपत पिण्यायोग्य पाणी टाकुन घट्ट पाक करुन घ्यावा २. पाकात वेलची पूड टाकु शकता.
कृती
१. तुप थोडे कोमट करुन घ्यावे/पातळ असावे. २. मैद्यामध्ये तुप व सोडा घालुन एकजीव करावे. ३. पोळीसाठी कणिक मळतो तसे , वरील मिश्रणात ताक/दही घालत घालत मळून घ्यावे हि तिंबलेली कणिक मऊसूत आणि सैलसर असावी. बोटाने स्पर्श करुन पाहिला तर कणकेच्या आत बोट गेलं पाहिजे (थोडंफार पुरणपोळी साठी भिजवतो तशी कन्सिस्टन्सी ) ४. वरील मैद्याच्या मिश्रणाचे लिंबाएवढे एक एक गोळे तळहातावर घेऊन चपटे करावे, मधोमध छिद्र पाडावे. थोडक्यात, त्या पामर मैद्याच्या गोळ्यांना बालुशाहीचा आकार द्यावा ५. जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे, तेल अगदी गरम करावयाचे नाही. फक्त कोमट होऊ द्यायचे आहे ६. तेल कोमट झाले की आच बंद करावी. ७. ह्या कोमट तेलात एक एक करुन वर तयार केलेली बालुशाही सोडावी असे केल्यानंतर कडेकडेने पिटुकले बुडबुडे येऊ लागतील, एक एक बालुशाही तेलातल्या तेलात हळूच ऊडी मारुन वर तरंगु लागेल ८. असे झाल्यानंतर आच सुरु करावी. ९. बालुशाही थोड्या लालसर झाल्या की उलट करुन/ परतून/ दोन्ही बाजुंनी तळून घ्याव्यात १०. लालसर दोन्ही बाजुंनी तळून झालं की आच बंद करावी ११. तळलेल्या बालुशाही एका स्टीलच्या चाळणीत किंवा ताटात झार्याने काढुन घ्याव्यात १२. पाकात ह्या तळलेल्या बालुशाही बुडवुन थोडा वेळ (पाक मुरेपर्यन्त ठेवाव्यात) पाकातुन काढुन डिशमध्ये आणि डिशमधुन उचलून थेट खाऊन टाकाव्यात.
अधिक टिपा
१. तळणीच्या तेलाचे तापमान योग्य साधले पाहिजे. एकदा वरील कृतीप्रमाणे करुन पाहिलं की अंदाज येईल. तेल जास्त गरम झाले तर बालुशाही खुसखुशीत होत नाहीत.२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही