प्रत्यक्षात लागणारा वेळ: १५ मिनिटे
साहित्य – १ वाटी आमंड मिल,अर्धी ते पाऊण वाटी गूळ,अर्धा चमचा फ्रेश वेलदोडे पावडर,अर्धा चमचा फ्रेश जायफळ पावडर,५-६ केशर काड्या,
कणिक साहित्य:
नेहमीची पोळीला भिजवतो ती कणिक , मीठ, तेल, पाणी,२ चमचे जवस पावडर
कृती -: वरील दिलेले सारणाचे साहित्य ग्राइंडर मध्ये एकदम बारिक करून घेणे. लाडू करायचे नाहीयेत पण लाडू वळता येतील अशी कन्सिस्टन्सी हवी.गुळाचे प्रमाण लागेल तसे कमी जास्त करावे.नेहमीच्या पोळीला लागणारी कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवून घ्यायची. मी रोजच्या कणकेत जवस पावडर घालते. ती नको असेल तर वगळू शकता.आता पुरणपोळी मध्ये जसे पुरण भरून पोळी लाटतो तशी पोळी सारण भरून लाटून घ्यायची.बारीक ते मध्यम आचेवर वर दोन्ही साईड ने साजूक तूप लावून खमंग पोळी भाजायची.पोळी पूर्णपणे गार झाली की खायला घ्यायची.
अधिक टिपा:
ह्या पोळीची टेस्ट खूपशी खवा पोळी सारखी लागते.
आमंड मिल नसेल तर घरी बदामाची बारीक पूड करून वापरता येईल.
निम्मे दाण्याचे कूट आणि निम्मे आमंड मिल वापरून पण हि पोळी मस्त लागते.
आमंड मिल नसेल तर दाण्याचे कूट वापरू शकता. दाण्याची पोळी पण मस्त लागते.
कणकेत रंगासाठी अगदी थोडी हळद वापरू शकता.
ही पोळी लगेच खाण्यापेक्षा उशिरा खाल्लेली जास्त छान लागते. (म्हणजे सकाळी करून संध्याकाळी खाल्लेली वगैरे)
प्रवासात पण छान टिकेल.