For more information read following article.
भक्तिभाव
ईशवराचे भजन, पूजन, कीर्तन , प्रार्थना,नामसमरण, उपवास, व्रत, होमहवन, जपतप इत्यादी गोष्टी करण्यास साधारणपणे भक्ती असे म्हंटले जाते , आणि हि भक्ती ज्या भावनेतून केली जाते त्याला भक्तिभाव असे म्हणतात. भक्तिभाव हि एक विशिष्ट मानसिक भावना आहे. ती भावना मनात निर्माण करण्याकरिता ज्या क्रिया करण्यात येतात तिला भक्ती असे म्हणतात. प्रत्येक धर्मानुसार भक्तीचे स्वरूप निरनिराळे दिसून येते. परंतु भक्तिभाव हा मनुष्याच्या धर्मावर अवलनबुन नसून मुख्यत्वे त्याच्या ज्ञानावर अवलनबुन असतो. मनुष्य भक्ती करतो कि नाही यापेक्षा त्याच्या मनात भक्तिभाव आहे कि नाही हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे. कारण आज बाह्यतः अनेक व्यक्ती भक्ती करताना दिसतात. परंतु त्यांच्या मनात भक्तिभाव असतोच असे नाही. आताशा; भक्तिभाव पेक्षा भक्तीलाच जास्त महत्व दिलेले दिसतेय. निरनिराळे धर्म व धार्मिक पंथ यांच्या अनुयायांची वाद, भांडणे, मारामार्या, लढाया या त्यांच्या मुळाशी हे आचार विषयक मतभेद असतात. भक्ती आणि भक्तिभाव यांच्या मधील यातील फरक लक्षात आल्यास हे कलह कमी होऊ शकतात.परमार्थ किंवा व्यवहार यात भक्तिभावाला खरे महत्व असून भक्तिभावाशिवाय नुसत्या भगवतीच्या बाह्य आचरणाला विशेष किंमत नसते सर्व विश्वाच्या कारभाराचे नियंत्रण करणारी कोणीतरी एक सर्व सामर्थ्य संपन्न शक्ती विश्वाच्या मुळाशी आहे. जागतिक सर्व स्थावर जगम पदार्थ म्हणजे त्या शक्तीने आपल्या अतर्क्य लीलेने धारण केलेली निरनिराळी रूपे आहेत. तिच्या प्रेरणेने विश्वातील सर्व कारभार चाललेला आहे. एक झाडाचे पण सुद्धा त्या अतर्क्य शक्तीच्या इच्छे विरुद्ध हळू शकत नाही. हीच जांबिव मनुष्याच्या बुद्धीला झाली म्हणजे त्याच्या मनात जी भावना निर्माण होत असते त्याला भक्तिभाव असे म्हणता येईल. अतर्क्य शक्तीला ईशवर म्हणतो व भक्तिभावाला ईशवर निष्ठा म्हणतात. भक्तिभावाने सुपरिणाम व्यवहारात अनेक प्रकारे दिसतात. भक्तिभाव हि दैवी भावना आहे. हि असामान्य आहे. ज्यांच्या मनात ती असते त्यांच्या मनात आसुरी भावनांना प्रवेश मिळू शकत नाही. मनात उत्कृष्ठ भक्तिभाव असला म्हणजे अनिष्ठ भावनांना तेथे ठार मिळत नाही. हा अनुभव व्यवहारात येतो. अहंकार, भीती, दुःख, क्रोध द्वेष, लोभ, सूद इ. अनिष्ठ भावना भक्तिभाव युक्त मनुष्यात कधीच दिसत नाही. त्यांच्या मनाची शांती कधीच नष्ट होत नाही. मनुष्याची स्थिती आयुष्यभर एक सारखी राहू शकत नाही, प्रत्येकाची स्थिती कालामाना नुसार बदलतेकधी भरभराटीचे दिवस असतात तर कधी अपयशाचे , कधी संकटे हात धुऊन पाठीमागे लागतात. या दोन्ही परिस्थितीत सामान्य मनुष्याची मनोवृत्ती निरनिराळ्या प्रकारची असते, भरभराटीच्या काळी सामान्य मनुष्याचा अहंकार प्रगट होतो. त्यामुळे भरभराटी नंतर पुन्हा अधोगतीला गेलेली उदाहरणे कितीतरी आहेत.ज्यांच्या मनात खरा भक्तिभाव जागृत असतो ते सर्व,कर्ता करविता परमेशवर आहे या गोष्टीची जाणीव सदोदित मनात बाळगतात. सुखात-दुःखात ते परमेशवराला धन्यवाद देतात. त्यांच्या अंगी विनयशीलता, नम्रता,सौजन्य, भूतदया, सहानुभूती दिसत असते.
कर्म करणे आपल्या हाती आहे त्याचे इष्ट्फळ मिळणे किंवा न मिळणे हे परमेश्व्राच्या आधिन आहे. अशी भावना मनात जागृत असली म्हणजे दुर्गुण किंवा अनिष्ठ भावना हे डोके वर काढीत नाही. यांच्या कुठल्याही कार्यात इतरां कडून कधीही अडथळे होत नाही. त्यांची भरभराट होत असते. भरभराटीच्या काळी मनाला भडकू न देणारे व आपत्तीच्याकाळी मनाला अभय करून शांती व धैर्य देऊन त्यांचा उत्साह वाढविणारे भक्तिभावासारखे दुसरे औषध नाही असे म्हणणे योग्य होय.भक्तिभाव मनुष्य आपत्तीने दबून जात नाही. किंवा संकटाना डगमगत नाही. ज्या अनिष्ट घटना घडत आहे त्याच्या मागे परमेशवराचा काही शुभ हेतू असावा हा उद्देश ठेवून त्याचा शांततेने स्वीकार करतात. त्यांची मने सदैव स्थिर असतात त्यामुळे संकटांची तीव्रता त्यांना भासत नाही. त्यातून सुखरूपपणे बाहेर पडतात. परमेशवर आपल्याला मदत करतो अशी निश्चित भावनाच त्यांच्या मनी वसंत असते. भक्तिभाव युक्त मनुष्य हा जगातील सर्व मनुष्यप्राणी यांना ईशवर रूपे मानूनच व्यवहारात वागतो. सर्व कर्मे करताना आपण ईशवराचीच सेवा करीत आहोत अशी भावना असते.
व्यवहारातील प्रत्येक काम उत्तम प्रकारे करावे म्हणजे ती सहज व समाधान कारक होतात. त्याच्याच अंगचे कौशल्य दिवसेंदिवस वाढत जाते. त्यांच्या विषयी लोकांच्या मनात आदर व आपुलकी वाढते, व्यवहारात तो जास्त यशस्वी व सुखी होतो. ऐहिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस उत्कर्ष होत जातो. आणि परमार्थिक दृष्ट्या त्याचे कल्याण होते. ईशवरार्पण भावनेने आपले कर्तव्य करीत राहणे हाच खरा भक्तिभाव होय. त्याच व्यक्तीला ईशवर सदा सहाय्य करितो.
मनुष्य कितीही दुराचारी असला तरी त्याच्या मनात खरा भक्तिभाव जागृत झाला तर तो साधू किंवा धर्मात्मा होतो. त्याच्या हातून दुराचरण होऊ शकत नाही. त्याची सर्व दुःख नाहीशी होतात. सर्व भावाने ईशवराला शरण गेल्याने परमशांती मिळते त्याची ईशवरावर अनन्य निष्ठा असते, त्याच्या प्रत्येक भावना शुद्ध होऊन तो ब्रम्हरूप होण्यास समर्थ असतो अखेर त्याला शाश्व्त सुख प्राप्त होते.