अमूल्य संधी – आईची
Like
Like Love Haha Wow Sad Angry
91

The classical truth is that thousands of years ago, people who have identified themselves have given special emphasis on taking special care of  pregnant woman. women should not be exploited, they should not be suppressed, women should not be subjected to harassment due to overwhelming men and women, and women who want women should take full advantage of their opportunity. They should do such a ritual for their children that such a culture will not happen in the next generation. Of course, it will be the first step towards their childbirth.

Great opportunity - Mother

बाल वयात मनावर  केले जाणारेसंस्कार किंवा न कळत होणारे परिणाम आयुष्यभर पुसले जात नाही. हे जाणार्या आपल्या पूर्वजांनी  बाळ मनाची निगराणी फारच काळजी पूर्वक केली जावी अशी दक्षता घेतली  गर्भातल्या जीवावरही  आईच्या भाव भावनांचे, बाह्य वातावरणाचे परिणाम होतात, हे तर पाश्चात्य वैद्यकीय शास्त्राने मान्य केलेले आहेच.

 हे शास्त्रीय सत्य हजारो वर्ष्यापूर्वीच ओळखणाऱयांनी  गर्भवती स्त्रीच्या मनाची  विशेष काळजी घेण्यावर फार भर दिला आहे. त्या अवस्थेत सतत प्रसन्न राहावी म्हणून भोवतालचा परिसर, घरातील वातावरण आनंदी राहावे. असे सांगितलेले आहे. तसेच उत्तम स्त्री-पुरुषांच्या कथा तिने ऐकाव्या, उत्तम आहार घ्यावा,  शरीराला आवश्यक तोच व्यायाम घडेल असेच खेळ खेळावेत आणि गर्भाच्या निकोप वाढीसोबतच त्याच्या उत्तम भावनिक, मानसिक वाढीची काळजी घ्यावी असे आवर्जून सांगितले आहे. छोटा जीव जन्माला आला की आईची जबाबदारी अधिकच वाढते. घरातील इतर स्वकीयां पेक्षा आईच्या सहवासातच हा बाल जीव अधिक काळ असतो आणि आईचा श्वास, तिच्या मायेची उब जितकी जास्त  लाभेल तितकी तितकीच त्या बाळ जीवाची शारीरिक व मानसिक वाढ निर्दोष आणि निकोप होते , हे लक्षात घेऊननच आज प्रगत पाश्च्यांत राष्ट्रांमध्ये व इतरत्र सर्वच ग्रामीण भागांमध्ये मातेच्या दुधाचे महत्व सर्वत्र तरुणींना पटवून दिले जात आहे. तसेच प्रसूतीच्या  रजेची काळ मर्यादा वाढवून दिली जात आहे  आपल्या बाळाला मातेचा  जास्तितजास्त सहवास देणे हि आईसाठी आंनद दायी गोष्ट आहे.

 चूल आणि मुलं एवढेच  स्त्रीचे क्षेत्र आहे कां? त्यांची बुद्धी आणि शक्ती मुलांना जन्म देण्यात, वाढविण्यात, ‘रांधा, वाढा, उष्टी काढा, यातच खर्च करावयाची का? असेल प्रश्न आता राहिलेले नाही. त्यांच्या व्यक्तिविकासावर आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर शिशु संगोपनाने बंधने पडतात असे आजच्या तरुणीला वाटत असते. कारण शिक्षणामुळे तिच्या अभिजात बुद्धीला कर्तबगारीची सर्व क्षेत्रे आता खुली झाली आहे.  केवळ नोकरी नव्हे तर ‘करिअर’ तिची वाट पहात असताना, संसारिक जबाबदाऱ्या, विशेषतः मुलांना वाढविणे तिच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा आणतात असे तिला वाटत असते. आणि अशावेळी तिला निसर्गाने आपल्यावर केलेला अन्याय आहे, अशी तिची मनोधारणा होण्याची शक्यता असते, अशा प्रकारचे अनेक प्रश्न तिला पडून  बुद्धीचा गोंधळ होतो तेव्हा परंतु याची उत्तरे शोधण्यासाठी पूर्वजांनी दिलेल्या संस्काराची मदत होत असते, ते एक प्रकारे मार्गदर्शन होय. निसर्गतः स्त्री-पुरुष्याच्या घडणीत भिन्नता आहे, हि बाब तर मानायला हवी. दोघांचे उणेपण आणि दोघांची बलस्थाने  नेमकी अशी आहेत कि ती एकत्रितपणे निर्दोष होतात, व परिपूर्ण होतात म्हणून निसर्गाच्या या तत्वांचा आदर करायला आपले भारतीय संस्कार शिकवितात,  तरुणीची गृहिणी होणे व गृहिणीची माता होणे हि तर स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचे टप्पे होत.  आई होण्यामुळे आपल्या व्यक्तीत्वाला पूर्णत्व येते हि स्त्रीला पटले तर या आई होण्याची अडचण तिला वाटणार नाही. किंवा आपल्या व्यक्तीमत्वांच्या विकासामधील हा अडसर आहे असे वाटून तिची चरफड होणार नाही, आपल्या मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक विकास करण्याच्या अमूल्य संधीला अडसर म्हणणे हा स्त्रीने निसर्गावर केलेला अन्याय ठरेल.

 परंतु स्त्रीचे शोषण होऊ नये, तिला दडपली जाऊ नये, घरातील पुरुषी वर्चस्वामुळे आणि अरेरावी मुळे तिच्यावर असाह्यतेची स्थिती ओढवू नये  हि ज्यांची इच्छा आहे अशा स्त्रियांनी निसर्गाने दिलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे.  त्यांनी आपल्या मुलांवर असे संस्कार करावे कि पुढल्या पिढीवर असे संस्कार होणारच नाही.  मुलगा असो वा मुलगी दोघांनाही समसमान वागणूक देणे, अर्थातच हीच त्यांची संस्कारांची पहिली पायरी असेल.

 परंतु याचा अर्थ असा नव्हे कि मुलींना मुलांचे कपडे घालणे किंवा मुलीने मुलासारखी भाषा म्हणजेच वाक्प्रचार वापरणे,किंवा रात्री उशिरा पर्यंत घरा बाहेर राहणे, असा होत नाही. पुरुषांची हि बरोबरी म्हणजे समानता निश्चितच नव्हे. उदा- बॉयकट केस कापणे, पँट  – टीशर्ट घालणे, कपाळावर टिकली किंवा हातात काहीच न वापरणे, या फार वरवरच्या गोष्टी आहे. त्या चट्कन नजरेत भरणाऱ्या असल्या तरी त्यांचा वैचारिक पातळीवर संबंध असतोच असे नाही. सोयीची वाटते म्हणून पँन्ट वापरणे, ‘ आणि पुरुष्यांनीच पँन्ट का घालायची ? आम्हीही घालू ‘ या अट्टाहासापोटी पँन्ट वापरणे ह्यांत बराच अंतर आहे. पुरुषाचे अनुकरण करणे म्हणजे मुक्ती नव्हे. स्वतः;चे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणे, स्वतः: आत्म निर्भर होणे, वैचारिक स्वातंत्र्य राखणे हि मुक्तीला  अभिप्रेत आहे.  स्त्री-पुरुषांना कुटुंबात समान दर्जा आणि महत्व लाभणे अभिप्रेत आहे. कुटुंबात हि समानता आली कि  काही काळाने ती समाजात ओघानेच येते.  कारण समाज हा कुटुंबाचाच बनलेला असतो.  हि समानता मुलांच्या मनावर बिंबवण्याची संधी ते-वडिलांना आणि त्यातही प्रकर्षाने आईला ल्काभलेली असते.  तिने हे आपल्या वागण्यातून ती स्पष्ट केल्यावर त्याचे बाल मनावर आपोआपच ते संस्कार उमटणार त्यासाठी वेगळे असे काहीही करावे लागत नाही.  मात्र त्यासाठी आईच्या मनाची व विचारांची बैठक पक्की असायला हवी.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
91  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d