Spiritually, religion has been defined in many ways according to its experiences and according to its status. All the religions and scriptures on the back of the world are reverential. All religions say humanism The religion which we believe is self-righteous. This article will teach you about the religious experiences . Silence is necessary for spiritual life. Speech is the power, there is Divine, there is strength. Mute makes a person influential, even though the word is one, yet many powers are filled with it.
अध्यात्मिक दृष्ट्या अनादिकालापासून धर्माची व्याख्या अनेक संतांनी आपापल्या अनुभवानुसार तसेच त्यांच्या अवस्थेनुसार अनेक अर्थाने केली आहे. परंतु सर्व साधारणपणे मनुष्याला उन्नत होण्यास व त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विभिन्न अंगामध्ये सुसंवाद निर्माण करण्यास सहाय्य करते तो धर्म, आणि कोणत्याही प्रगतीत जे काही अडथळा निर्माण करते किंवा अधःपतनाला सहाय करते तो अधर्म अशी हि सोपी व सरळ व्याख्या संतांनी केली आहे. जगाच्या पाठीवर असणारे सारे धर्म आणि धर्मग्रन्थ आदरणीय आहेत. सारे धर्म मानवधर्म सांगतात. आपण स्वतः: ज्या धर्माला मानतो तो ‘स्वधर्म’ होय. प्रत्येकाने स्वधर्म समजून घ्यायला पाहिजे.’स्वधर्म’ समजून घेतला तरच स्वकर्म आपोआपच समजेल. प्रत्येक कर्म मग विवेककर्म होईल. एकदा का मनुष्य ‘मी कोण आहे’ हे जाणीव पूर्वक विवेकी बनला कि मग बाहेरून सुंदर दिसणारे व आपलेसे करणारे,रसदायक,व सुखकारक असे संसाराचे भोग त्याला काहीसे दिसेनासे होतात. याचा अर्थ विवेकी मनुष्य संसाराच्या भोगा पासून दूर जाऊ लागतो. स्वधर्म पाळला तर पश्चाताप करण्याची अशी कोणतीही कृती आपल्या हातून होऊ शकत नाही.
धर्माचा संबंध सत्याशी आहे, पण यासाठी उत्तम श्रम, निष्कपटता , निराभिमान, आत्मशुद्धी या सोबतच उत्तम सत्यव्यवहार असायला हवा. सत्याची खोज हि उत्तम सत्यानेच होत असते, मनुष्याने कोणतेही बोल बोलताना याचा विचार करावा कि मी काय बोलत आहे. एकदा का सत्यवचनाची गोडी वाणीत उतरली. तो मनुष्य सर्वांनाच हवाहवासा वाटतो. आयुष्याचा पाया सत्यजीवनातच आहे. मनुष्याला कर्मे हि करावीच लागतात, कर्मे दोन प्रकारची असतात. सकाम कर्म आणि निष्काम कर्म. सकाम कर्मात मनुष्याला विचित्र विषयाची तहान असते मनुष्य नेहमी आपले फायदे, कमिशन पहातो. निष्काम कर्मात ती तहान नसते. भारतीय संस्कृतीचा मूळ पाया निष्काम कर्म करणेच सांगतो.
‘स्वधर्म’ कोणताही असो तो तमोगुण व रजोगुणातून बाहेर पडण्याचे सांगतो, मणजेच कर्माला विक्रमाची जोड दयायला सांगते. यातून अकर्म होते. अकर्म झाले कि कोणत्याही कामाचा बोजा वाटत नाही. ते सहज होते. व्यवहार करताना असा करावा कि कुणाचेही नुकसान होणार नाही.
अध्यात्मिक जीवनासाठी मौन आवश्यक आहे. वाणी हि शक्ती आहे, दिव्यता आहे, सामर्थ्य आहे. ती शक्ती व्यर्थ घालवू नका. वाणीच्या आवेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी साधनेची गरज आहे. मौन मध्ये संकल्पबळाची वृद्धी, आत्मबलाची वृद्धी,शक्तिसंचय होत असते. क्रोधाचे दमन होते. व्यर्थ संकल्पना मिटतात. मन शांत व निर्मळ होते. मौना मुळे. वाणी प्रभावशाली बनते.
मौन मनुष्याला प्रभावशाली बनविते, शब्द एक असला तरी त्यामागे अनेक शक्ती ओतप्रोत भरलेल्या असतात. शब्द, तारुण्य आणि वेळ हे वाहत्या पाण्या प्रमाणे आहे, हे मागे फिरून कधीच येत नाही. हा निसर्गाचा न्याय आहे. एक ना एक दिवस सर्वांनाच जायचे आहे तसे विज्ञानामुळे मनुष्याची आयु मर्यादा वाढविली आहे. परंतु शांती, सामाधान हरपले, लोक पैशासाठी नुसतेच धावत आहे. मनुष्याने स्वतः:च्या सुखासाठी इतरांचे आयुष्य कमी केले, वृक्षतोड यामुळे प्राणी,पशु,पक्षी यांना भय झाले त्यांना राहणाची सोय उरली नाही. मास भक्षणा साठी प्राण्यांना मारणे. हे सर्व मनुष्याने कबूल केले. आज सर्वत्र विचित्र चित्र दिसत आहे. स्वधर्म बाजूला ठेवून , इतरांच्या पंचायती, फाजील गप्पा मारण्यात मनुष्य व्यस्त आहे. कामचुकारपणा, आळस या मानसिकते मुळे अनेक जण सरकारी नोकरी यासाठीच पसंत करतात, तसे काम करण्यावर दबाव देणारे कुणीच नसतात. मनुष्याला मेहनत कमी आणि पैसा जास्त याच कल्पनेत मनुष्य आळसाला जवळ करीत आहे.
आपल्या सभोताल जे आहे त्यात सौन्दर्य कसे निर्माण करू शकू याचा प्रयत्न करा, स्वतः जगा व दुसर्याला जगू द्या.
पशु,पक्षी प्राणी,वृक्ष यां वर प्रेम करा. सर्व व्यवहार करताना विवेक जागृत ठेवा. निसर्गावर प्रेम करा.निसर्गा पासून जे प्राप्त होत आहे ते वापरताना विचार करा निसर्ग माफ करीत नाही, उद्या अशी परिस्थिती आणू नका कि पाण्याच्या एका थेंबा साठी व्याकुळ व्हावे लागेल. निसर्ग हि माता आहे, तिने दिले म्हणून आपण जगत आहोत. अन्न, वस्त्र, हवा, पाणी, निवारा तिनेच दिला. मनुष्य येताना काय घेऊन आला काहीच नाही. सृष्टीवर आल्यानंतर जे काही आपण मिळवितो, पृथ्वीच्या पोटातून सर्व सामुग्री प्राप्त करून घेतो. मनुष्याने विज्ञानांद्वारे वेगवेगळे कितीही प्रयत्न केले व मिळविलें ते सर्व तिच्यातूंच सृष्टीच्या बाहेरचे मनुष्या जवळ काहीच नाही.
मनुष्याने फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करावे. प्रत्येक कर्म सात्विक असले पाहिजे. तुम्ही जे कर्म करिता त्या पासून सुटका नाही. स्वधर्म पाळल्याने कर्मात, वाणीत दृष्टता येणार नाही, आरोग्यास बाधा येणार नाही. स्वधर्म पाळणारा कधीच पश्चाताप करीत नाही. त्या सभोवताली आनंदी वातावरण असते. ज्याला जगता आले नाही त्याला मृत्यू समयी सुद्धा पश्चाताप करावा लाजतो. मृत्यू म्हणजे सत्य स्वरूपाची प्राप्ती, मृत्यू म्हणजे माहेर, मृत्यू म्हणजे परम आनंद. त्याला हसत समोरी जाणारा परम भाग्यवंत होय.
सर्व प्राणी मात्रांमध्ये एकच परमात्मा वास करीत आहे. हीच भावना मनात ठेऊन कोणासही दुःख न देता , आपुलकीने सर्वांशी वागावे सम भावना ठेवून सर्व व्यापक भावनेने मी माझे आचरण करील असा संकल्प मनात करावा. मनुष्य खोट्या अमिषा मागे धावून सत्याचा लिलाव करून बसतो. म्हणून संत म्हणतात जीवनात कसाही प्रसंग आला तरी विचलित होऊ नका, तुम्ही आत्मा आहात अविनाशी आहात, अंतरात्म्यातील शक्ती जागरूक असू द्या उत्तम संस्कार, त्याग, अहिंसा, सत्य, अपरिग्रह, ब्रम्हचर्य , सत्कर्म हे सर्व ‘ स्वधर्म’ पालन करण्याची लक्षणे होत.