Your Mother Has changed? What do you think? First teacher, first teacher, first girlfriend, first guide is ‘mother’. Whatever the change, the child’s fondness is the mother. We learn from mother and follow the each steps she guide us. She never think negative for the children. Today the world has changed and many times we can see the attitude and living of mother also changed. This article is based on worlds changes and Mother.
मुलांची पहिली सहाय्य्क, पहिला गुरु, पहिली शिक्षक, पहिली मैत्रीण, पहिली मार्गदर्शक म्हणजे ‘आई’. पद्धत कितीही बदलली असेल तरी मुलांचे भले करणारी म्हणजे आई, तीच मुलाला सारे काही शिकवीत असते, दुसऱयांचा दृष्टिकोन कसाही असो परंतु मुलांचे संगोपन करताना ती आपले प्राण पणाला लावूनच मुलांसाठी जे काही करीत असेल ते तिच्या दृष्टीकोनातून चांगलेच असते, तिच्या भावनेत कधीच मुलांसाठी कटुता नसते. परिस्थिती म्हणजे आज मुलांच्या गरजा आणि आवश्यकता पूर्ण करण्याच्या पद्धती बदलेल्या असल्या तरी मातृत्व बदललेलं नाही. ते बदलणारही नाही. मुले सुखी राहावे, ते सर्व बाबतींत उन्नत व्हावे, हीच तिची भावना असते. त्यांच्या सुखसोयी, हौस पुरविण्याच्या पद्दती बदल्यात त्याच प्रमाणे आईला बदलावे लागले असे म्हणायला हरकत नाही. कारण काळानेच आज असाबद्दल घडवून आणलेला आहे, त्यानुसार विचार- आचार बदलावेत लागेल. आजची जीवनशैली मुलांची असो वा आईची यात एवढा बदल झाला आहे, त्यानुसार विचारांत बदल घडून आलेला आहे. ! आज आई होताच मुलांच्या अपरोक्ष ती सारे काही विसरून जात नसते. ती स्वतः चा फिटनेस, करिअर बाबत तितकीच सजग राहण्याच्या प्रयत्नात असते. तसेच कुटुंबात ती कायम, सजग राहण्यासाठी तत्पर असते. हा बदल केवळ सुशिक्षित किंवा नोकरी वर्गातीलच स्त्रीसाठी नव्हे तर सर्वसामान्य घर गृहस्थी करणारी किंवा शेत मजुरी, मोलमजुरी करणारी स्त्री सुद्धा बदललेली आहे. हा बदल चुकीचा नाही. स्वतः: ला तंदुरुस्त आणि आरोग्यदायी व मॉडेल ठेवणे हे चुकीचे नाही. उत्तम प्रकृती हि दीर्घ जीवनाची गुरुकिल्ली आहे ती सर्वांनाच हवीहवीशी असते. मात्र स्वत:ला फिट ठेवण्याच्या नादात कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होऊ नये याकडे विशेष लक्ष ठेवणे हे गरजेचे आहे. ह्यात मातृत्व व गृहिणी यात विषमता यायला नको.
कधी कधी विचार प्रकृतीला प्रभावित करतात. सर्व बाबतीत सकारात्मक विचारांचा परिणाम आपल्या आरोग्यावर, किंवा मुलांच्या संगोपनात आपल्या परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. मातृत्वात आरोग्य चांगले असेल तेव्हाच तुमचे सौन्दर्य अधिक खुलेल बहुदा त्यामुळेच आजची माता प्रत्येक क्षेत्रात यशस्वी, आनंदी आणि सुखी राहणे गरजेचे आहे आणि तेच व्यक्तिमत्व सकारात्मक परिणाम जीवनशैलीवर घडवत असते. समाज शास्त्रांच्या मते स्त्रियांच्या ५० ते ६० वर्षे वयाच्या स्त्रियांमध्ये कमालीचे परिवर्तन झाले आहेत. याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यानंतर उच्चं-शिक्षण लाभलेले आहे. कुटुंबीय आणि नातलगांचे प्रोत्साहन हि स्त्रीला लाभले यामुळे तिची सजगता वाढली. कुटुंबाला सुशिक्षत करण्यासोबत मर्यादित कुटुंब आणि बहुउद्देशीय जीवनाचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. एकविसाव्या शतकात येइपर्यंत महिलांमध्ये अभूतपूर्व बदल घडून आल्याचे समाजशास्त्र मानतात.
आर्थिक स्वयंपूर्णतेमुळे कुटुंबाची पत वाढली. आणि स्वत:चे व्यक्तिमत्व आकर्षक करण्याच्या ईर्षेनेंहि सावध झाली. आज स्त्रिया घरातील कामांत गढलेल्या असतात. तेवढ्याच पार्लर मध्ये जाऊन सौन्दर्य वृद्धीचा आनंद घेतात. या सर्व कारणांनी माता अधिक स्टायलिश व आकर्षक आणि पहिल्याहून अधिक तंदुरुस्त झालेली आहे हाच बदल घडलेला आहे.