आई-बाबांची महती तेवढीच व सारखीच
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Mother and Father both Have Equal Importance. : ‘Matru Devo Bhava, Pitru Devo Bhava’ This is our culture, Mother is first Guru of the child.  But today we write about only mother and the authors and writers gives the mother the first position and No one praises the father. This article is basically shows the importance of both Mother and Father Equally.

Aai - Wadil ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव’ हि आम्हा भारतीयांची संस्कृती, आई हि मुलाचा पहिला गुरु आहे. आई मुलाशी एकरूप होते व मूळ हे आईशी एकरूप होते. नंतर बाळाला ओळख होते ती बाबांची. परंतु आजही  ‘आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार’  असेच म्हटल्या जाते. प्रत्येक श्रेष्ठ महात्मे आपल्या लखणीतुन आईची महती आजही लिखित आहेत. लेखक हे आईला प्रथम स्थान देतात तसेच चित्रकार कुंचल्यातून वात्सल्याची मूर्ती रेखाटतात ती आईची प्रतिमा असते. कथाकार कथेतून आईची महती कथितात व गवई गाण्यातून आईची गीते  गातात. वडिलांची कुणी स्तुती करीतच नाही. लिहिने  वा बोलणे दूरच सर्व घटकांतून वडिलांना दुर्लक्षित केलेले दिसतात. परंतु आईला ‘आईपण’ देणारा पिताच आहे, हे परम सत्य तर कुणीच नाकारू शकत नाही.

   आईची माया हि धरणी पेक्षा भारी आणि वडिलांचे स्थान हे आभाळापेक्षा उंच आहे, जगात कुणीही कुणाला पुढे गेलेला बघू शकत नाही परंतु एक वडीलच आहे कि मुलाला खूप पुढे गेल्याचे पाहण्यास आतुर असतात. त्यात त्यांच्या आंनदाचा पारावार नसतो. त्याच स्नेहल स्वप्न साकारणाऱ्या वडिलांना आपण कधीच विसरू शकत नाही. किशोरावस्थेपासून तर तर आयुष्याचा बराच प्रवास त्याचे  बोट घरून आपण केलेला असतो. आई घर अनुभवते तर वडील जग अनुभवतात. स्वतः जीवनातील खाचखडगे ओलांडून खर्या अर्थाने तेच मार्गदर्शक होत असतात. बाहेरील जगाची, जाण त्यांना आई पेक्षा अधिक असते. व्यवहातील नफा-तोटा ते जास्त जाणतात. त्याची प्रत्येक टप्प्यावर मुलांना जाणीव करून देत असतात. आई-बाप हे घराचे मंदिर बनवितात, याच दोन मूर्ती म्हणजे मुलांचे खरे दैवत होय.

आईचे मन फार मृदू असते, परंतु वडिलांना त्यांचे मन हे वेळाकाळानुसार पाषाणापेक्षा कठोर बनवावे लागते. आई हि कुणा जवळ आपले मन व्यक्त करून दुख: हलके करून घेऊ शकते  परंतु वडील असे करू शकत नाही, प्रत्येकाने अश्रू गाळलेत तर मुलांनी कुणाकडे बघावे हि त्याची कणखर भावना असते. घरातील प्रत्येकाचे सांत्वन करता करता ते स्वतः: दुखणी विरळून टाकतात. दोन्ही वेळ जेवण घालणारी आई लक्षात राहते परंतु संपूर्ण आयुष्याची शिदोरी करणाऱ्या वडिलांचा विसर पडतो.

 वडिलांना कुटुंबातील प्रत्येकाची सारखीच काळजी घ्यावी लागते. प्रत्येक क्षणी सर्वांचे राहणीमान, शिक्षण, आरोग्य, खान-पेन, विवाह, आणि सर्व सुखसोयी त्यांनाच लक्षात ठेवाव्या लागतात. हे सर्व करता करता ते स्वतः: सुख, हौशी-मौज यांना त्यागतात. कौटुंबिक जीवनातील मोठमोठी वादळे त्यांनाच पेलावी लागतात. आपल्याला त्याचवेळी त्यांची गरज भासते.

Parentingआपण आपल्या जीवनात कधी साध्या गोष्टीवर लक्ष देऊन बघा जेव्हा पायांत काटा रुतला किंवा चालताना ठेच लागली कि ‘आई गं! हेच उच्चार मुखातून बाहेर पडतात. परंतु जेव्हा कधी रस्त्याने जाताना एखादा ट्रक आपल्या जवळून गेला किंवा एखादे वेळी मोठा साप आपल्या जवळून निघून गेला तेव्हा आपल्या मुखातून ‘बाप रे ! हेच उच्चार निघतात याचे कारण म्हणजे हे मोठे संकट असतात.  तेव्हा लक्षात घ्या, मोठे संकटाचे वेळी आपल्याला बापच आठवतो. हे नैसर्गिक आहे.

आई हे घराचे नियम आहे तर वडील हे नेतृत्व होय. आई हे मायेचा गोडवा तर वडील हे गोडव्याची सुंदर चव होय. म्हणून जीवनातील दोघांचे तुल्य बळ हे मुलामुलींना सारखेच असतात. त्यांचे कार्य हे सारखेच असते. एक मायेचा वत्सल वृक्ष तर दुसरा या वृक्षाला फुलविणारा कर्तव्यनिष्ठ  करुणामय सागर होय. म्हणून जेवढी महती आईची तेवढीच महती वडिलांची मानावी. या दोघांचे ऋण आपण  कधीच फेडू शकत नाही.  या दोघांचे पूजन म्हणजे गणरायाने आई व पित्याला घातलेली प्रदक्षिणा होय.  मात्र वडिलांच्या पडत्या काळात किंवा वृद्धावस्थेत त्यांच्या आधाराची काठी बनून त्यांना सर्वतोपरी सहाय्य्य करणे आमचे प्रथम कर्तव्य नाही काय?

 परंतु आम्ही आजच्या काळात वेगळेच स्वरूप बघत आहोत, मुले कमावती झाली कि आई-वडिलांना आपल्या जवळ ठेवण्यास तयारच नसतो. तर त्यांना वृद्धा श्रमाची वाट दाखवितात. किती हा नीचपणा स्वतः: सुशिक्षित सुसंस्कृत समजणारी मुले  अशी वागायला लागतात.  वेळ आल्यास ‘हे आमचे सालदार’  अशी ओळख करून द्यायला मागे-पुढे बघत नाहीत. यास काय म्हणावे? जे आपले खरे दैवत आहे त्यांना विसरून कसे चालेल, त्यांच्या कर्तबगारीने तुम्हाला हे वैभव प्राप्त झाले आहेत हे विसरू नका. याची जाणीव मनात ठेवून त्यांच्याशी सुसंस्कृत व्यवहार ठेवा. त्यानेच तुमची इज्जत व सम्मान वाढणार आहे. जे मुले म्हातारपणात आई-वडिलांची हेळसांड करतात त्यांची काहीच इज्जत नसते. त्यांची सदा निंदाच होत असते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu