समाजातील गैरसमजुती – धर्म




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

We are always fight for religion and put our human boundary line for the religion. But do you from where come from, Who is our Source of energy and God. Who is divine power for us. Dharma is a key concept with multiple meanings in the Indian religions — Hinduism, Buddhism, Sikhism and Jainism. This article on Marathi Unlimited Show you how the religion comes and there existence. Article : Misconception in the community religion.

Dharm Marathi Unlimited

आपल्या या जगात धर्माच्या नावावर लोकांमध्ये अनेक गैरसमजुती पसरविल्या गेलेल्या आहेत. या गैरसमजुतींचा खरे तर धर्माशी काही एक संबंध नाही. यातील एक गैरसमजूत अशी आहे कि तीर्थ स्थानी असलेल्या नदीत स्थान केले कि सर्व पापांचे क्षालन होते. हि समजूत गमतीशीर किंवा मूर्खताच नाही का?

आत्मा अमूर्त आहे. त्याला रूप रंग, गन्ध, स्पर्श  अशा संवेदनाच नाही, आणि पाणी तर मूर्त पदार्थ आहे. मग आत्म्याचे क्षालन पाण्याने कसेबरे होऊ शकेल. — लोक म्हणतात  ‘हे जल शुद्ध आहे, या पाण्याने स्नान  केल्यास शुद्ध, पवित्र व्हाल. पापांचे क्षालन होईल. त्या पाण्यात सतत राहणारे सर्व जीव जन्तु त्यांच्या सर्व पापांचे तर क्षालन होऊन  त्यांना मुक्ती  मिळायला पाहिजे, त्यांचे स्थानापन्न होऊन ईशवराच्या जागी स्थान मिळायला पाहिजे. असे कधी होईल काय?  थंड पाण्याने स्नान केल्याने शरीरातील दाह कमी होऊ शकतो,  परंतु आत्म्याची निर्मळता हवी असल्यास ती ज्ञानरुपी पाण्याने स्नान करून मिळू शकेल म्हणजेच ज्ञानप्राप्ती झाल्यानेच आत्मा निर्मळ होऊ शकतो. त्यासाठी नदीत स्नान करण्याची गरज नाही. नदीत स्नान करा, नदीचे स्नान हे शरीर स्वच्छतेपुरतेच आहे. धार्मिक दृष्टिकोन ठेवून स्नान करने बंद करा. या पाण्याने स्नान केल्याने पापे घुतली जातात, पुण्य घडते, हे मानणे म्हणजे अज्ञान होय. नदी, कुंड, समुद्र स्नान, पूजापाठ या रूढी काही विचार न करता पाळत असतो, देवळात जाऊन देवाला नवस करणे, माझे अमुक कार्य करशील तर सोन्याचा मुकुट चढवेन, पादुका चढवेन, हि देवाला लाच दिल्या सारखेच आहे. तेच सोने चांदी मिळविण्यासाठी पुन्हा दुसर्याची लूटमार करणे, फसवेगिरी करणे, भ्रष्टाचार करणे, म्हणजेच पुन्हा पाप करणे होय, इमानदारीने, मेहनतीने केलेल्या कमाईतून  देवाला लाच देण्याची गरजच नसते. पाप करून संपत्ती जमविली त्यातून देवाला काही टक्के देईन हे कबुलने म्हणजे महापाप होय. कोणत्याही कार्यालयात, किंवा ऑफिसात सत्यनिष्ठ प्रामाणिक अधिकारी कधीच लाच घेत नाही. मग प्रभू  तो तिन्ही लोकांचा स्वामी आहे त्याला काय कमी, या सर्व गोष्टींची गरज नाही. त्याला सोने रुपये चढवून आपल्या चोर कमाई, संपत्तीला उजागर करीत आहेत, संपत्तीचा कर वाचविण्या करिता, मंदिरे सजविल्या जात आहे, पूजेच्या नावाखाली, हर व्यक्ती पुजारी बनू पाहतो, त्यामुळे ते आळशी व ऐतखाऊ झालेले आहेत. त्यांना दुसरे तिसरे मेहनतीचे काम नको आहे. जो तो मंदिरातील काम शोधतो आहे.

Mazhab Ka Matalab

मंदिरातील चमकदमक मध्ये राहून ऐश-आरामाची जिंदगी जगायला उतावळा आहे. काळा पैसा लपविण्यासाठी मोठमोठी आश्रम उघडून बसलेली आढळतात. धर्माच्या नावाखाली काय काय घडत आहे. हेही आपण उघड्या डोळ्याने बघतच आहोत. पूर्वजांच्या रूढी जोपासण्याच्या नावाखाली हे अज्ञानी, भ्रष्टाचारी धर्माचे नाव देऊन फसवेपणा करीत आहेत. आणि सामान्य भक्तांना मंदिरात भयानक लुटण्याचे कार्य चालू आहेत, धर्माचे भय दाखवून दानाच्या नावा खाली पैसा लुटतात, रीती प्रमाणे केले नाही तर ईशवराचा कोप  होईल असे संभाषण करतात. राग, लोभ, मोह, प्रेम, मत्सर ह्या मानवी भावना आहेत. देव या भावनांच्या पलीकडे असतो हेच आपण समजून घेतले पाहिजे देवाचे दर्शन घेण्यासाठी श्रद्धा-भक्ती ची गरज असते, देवाला रुपया नको, रुपया हा मंदिरातील चोर,लुबाडूना हवा असतो. मनातील अंधश्रद्धा दूर सारून देवाचे दर्शन करा देव तुमच्यातच आहे पुरुषार्थ, माणुसकी जागरूक ठेवण्यातच देव दर्शन आहे. जुन्या रूढी, यात्रा, जत्रा यासर्व गोष्टींचा देवालयातील लोकांनी फार गैरफायदा उचललेला आहे. हे लक्षात घ्या.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा