Rejoicing in the progress of others is to open the way for our progress. And to be unhappy with the happiness of others, it is the law of nature to create problems in our happiness. In fact, you have never thought about childhood and happiness but this is the same. This article is based on Happiness and Knowing about yourself and Being Happy in the life.
मुख्य – इतरांच्या प्रगतीत आनंदी होणे म्हणजे आपल्याच प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आहे. आणि इतरांच्या सुखात दुखी होणं म्हणजे आपल्या सुखांवर अडचणी निर्माण करणे होय हाच निसर्गाचा नियम होय.
खरं तर बालपण आणि आनंद या वर आपण कधी विचार केला नसला तरी हे एकसारखेच आहे, लहान मुलाचे (अडीच वर्षे पर्यंत) मन सहजतेतच असते. म्हणजे अस्सल आनंद च्या अनुभवात असतो, नंतर मात्र तुलनात्मक मनाचा जन्म होतो, त्यातून त्याचे बालपण हळूहळू हरवू लागते. ते अडीच वर्षे पर्यंत त्यांना स्वतःच्या शरीराची जाणीव नसते, ते निराकाराच्या अनुभवातूनच सर्व काही बघत असतात. त्यांना नंतर हळूहळू आपणच बाहेरील जगा कडे आकर्षित करीत असतो त्यांना हेच सूचीत केल्या जाते कि तू ज्या आंनदात वावरतो त्यातून बाहेर ये. जाणीव करून देतो, ते त्या वेळी योग्यच असते. कारण आपणाला त्याला बाहेरील जगात, समाजात वावरण्यासाठी योग्य बनवायचे असते. तो त्याच आंनदात असला तर बाहेरील जगात जगण्यास तो लायक राहणार नाही. हीच आपली समजूत असते. मात्र एकदा का बाहेर आले कि पुन्हा त्या आनंदात जाण्याची संधी मिळत नाही. लहानपणाचा अनुभव मात्र सर्वांनीच घेतलेला आहे, ‘मी लहान नव्हतो असे कुणीच म्हणू शकत नाही’ लहान मुल आपल्या समोर शरीर आहे एवढेच तो बघतो, त्याचा बाजूला माझे शरीर आहे हे त्याला माहीतच नसते. परंतु नंतर हळू हळू त्याला समज येते. कि मी सुद्धा एक शरीर आहे, आपण त्याला याची जाणीव करून देत असतो, तेव्हा तो खरा आनंद विसरायला लागतो.
परंतु काही कालांतराने पुन्हा आपल्याला तो अनुभव घेण्याची संधी म्हणजे वृद्धापकाळ त्यात आपल्याला स्थापित व्हायचे असेल तर त्या अनुभवातून आपण निर्णय घेऊ शकाल. जीवनात आपण आपले निर्णय जर त्या अनुभवाद्वारे घेत नसाल तर आपले सर्व निर्णय अहंकार, भीती, लोभ, इर्षा आणि द्वेष यातूनच घेतलेले असतील. आपण स्वतःला इतरांपासून स्वतंत्र समजून आपलं वेगळं अस्तित्व मानून ते निर्णय घेणे म्हणजे पुढच्या आयुष्याला धोकादायक ठरेल.
परंतु आपणाला जेव्हा तो अनुभव प्राप्त होईल तेव्हा आपल्या लक्षात येईल कि बाहेरून जरी आपण वेगवेगळे वाटत असलो तरी सर्व शरीरांत समान अशी एक गोष्ट आहे ती एकसारखीच आहे, त्यामुळे आपण परस्परांशी जोडले गेलो आहोत तो आनंद म्हणजे शरीर नव्हेच!
आपल्याला शरीर समजण्याची दृढ मान्यता आपल्यात निर्माण झालेली आहे त्यामुळे जीवनात दुःखच शिल्लक राहते म्हणून स्वतः: ला जाणून घेणे गरजेचे आहे. या प्रयोगातून बघू —
उदा- क्षणभर आपल्या हाताकडे बघा स्वतःशी त्याचा अनुभव घ्या व लक्षातहि घ्या ‘मी म्हणजे हात आहे का’? आपल्या हाताशी आपला काय संबंध आहे ? त्यात कोणती भावना निर्माण होते ? मी म्हणजे हा हात आहे का? नाही! असेच म्हणावे लागेल कि हा माझा हात आहे, हा माझा पाय आहे, हे माझे डोळे आहेत, मी म्हणजे हात,पाय,डोळे, नाही. एखादे वेळी अपघातात हात किंवा पायाला इजा होऊन तो काढून फेकावा लागतो, मग आपले अस्तित्व तेथेच संपते काय? आपण असतोच तो अनुभव म्हणजेच ‘मी वेगळा आहे ‘ ‘मी पूर्ण आहे’ फक्त माझा हात काढण्यात आला. असे तर आपण म्हणत नाही कि मी पूर्वी पूर्ण होतो, आता अर्धा झालो. तर हेच सत्य समजून घ्यायचे असते, हाच अनुभव जाणून घ्यायचा असतो. ‘आपण काय आहोत’, आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांसोबत हा प्रयोग करून बघा, तेव्हा तुम्हाला योग्य उत्तर मिळेल.
‘मी संपूर्ण होतो आणि आहे’ मी म्हणजे हात,पाय,डोळे,नाक,कान,त्वचा नाही. तो मी म्हणजे वेगळा आहे. तो आजही आहे आणि सतत तुमच्यात आहे, ते जाणून घेणे म्हणजे खरा (त्वरित )आंनद मिळविणे होय. हाच खरा अंनत आंनद होय.
1 Comment. Leave new
Nice article by marathi unlimted.