Balsankar is important thing for the children to grow in right direction. Sanskars are of two types namely ‘good sanskars’ and ‘bad sanskars’. Good thoughts and related actions when done repeatedly create an impression on the subconscious mind of an individual and his attitudes becomes positive. Such actions are called as ‘good sanskars’. Bad thoughts and related actions when done repeatedly create an impression on the subconscious mind of an individual and his attitudes becomes negative. Such actions are called as ‘bad sanskars’.
संतांचे चरित्रवाचन –
आजची मुले तासन्तास पाश्चात्त्यांची बनवलेली ‘टॉम अँड जेरी’ यांसारखे निरर्थक आणि केवळ करमणूक प्रधान लघुपट बघत बसतात, त्या लघुपटात केवळ एकमेकांवर कुरघोडी आणि मारझोड हेच दाखवलेली असते. यांतून काय बोध प्राप्त होणार. त्यापेक्षा मुलांनी पंचतंत्र गोष्टी वाचल्यास त्यांना नीतिशास्त्र आणि व्यवहार यशस्वी करण्याविषयीची ज्ञान तरी मिळेल. पंचतंत्रातील गोष्टींमधून संस्कृत व सुभाषितेही शिकविलेले आहेत. अनेक पाश्चात्त्य कथालेखकांना पंचतंत्रांकडून प्रेरणा मिळाली. आणि त्यांनी ‘इसापनीती’ इत्यादी कथा लिहिल्या आहेत. आपल्याला ठाऊक आहे भारत हि संतांची भूमी आहे. संत ज्ञानदेव, संत जनाबाई, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदासस्वामी, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, गाडगेबाबा, संत नानकजी, इत्यादी अनेकानेक संतांची चरित्रे वाचनाने कितीतरी लाभ होईल.
संतचरित्रांतून आदर्श – सध्या समाजा समोर फारसे आदर्श नाहीत. त्यामुळे समाज दिशाहीन झालेला आढळतो. ‘ आपण कुणाचे अनुकरण करीत आहोत’ हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे कि नाही काय ठाऊक! काही लोक लेखक,संगीतकार,गायक यांनाच आदर्श मानतात, तर काहीजण शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती, किंवा मोठी उधोगपती यांना आदर्श मानतात, तर काही चित्रपट अभनेते आणि खेळाडू यांनाच आदर्श मानतात आणि त्यांच्या प्रमाणेच वागायचा प्रयत्न करतात. हे त्यांच्या परी ठीक ही आहे, परंतु संतचरित्रांतूनच सर्वा समोर योग्य आदर्श उभे राहतात. संतांची चरित्रे वाचून त्यांचे अनुकरण कसे करायचे, तेही कळते असे नाही.
संतांची शिकवण – संतांनी वेळोवेळी समाजाला योग्य दशा देऊन चांगल्या मार्गाकडे वळविले ती उदाहरणे वाचून आपणही चांगल्या मार्गाकडे वळतो, ज्ञानदेवांनी ‘सर्व प्राणीमात्रांच्या ईशवर असल्याने सर्वांवर प्रेम करा’ ते शिकविले. तसेच संत तुकारामांनी – ‘ सुखदुःखाच्या प्रसंगी देवाला आठवा’ हीच शिकवण दिली आहे.
संतचरित्र्याने जीवन आंनदी बनते – संत चरित्राचा अभ्यास केला तर आपली ईशवरावरील श्रद्धा वाढते. संत चरित्र आणि संतांचे विचार अभ्यासल्यामुळे जीवनात प्रभूची उपासना करण्याचे महत्व कळते. त्यामुळे आपल्या अंगी सद्गुण वाढून जीवन आनंदी होते. पुरुषार्थ व मानवता अंगी वास करते.
संतलिखित ग्रन्थ – मुलांनी संQतचरित्रांसह ग्रन्थ हि वाचावे. यांत ईशव्री चैतन्य असल्याने ते वाचल्याने ज्ञान वाढते व लाभ होतो. संतांचे राष्ट्र कार्य, त्यांची साधना, त्याची गुरु सेवा यातून आदर्श नागरिक बनून देशाचा अभिमान वाढवावा. राष्ट्र पुरुष व क्रान्तिकारी यांची चरित्र्ये वाचून व अभ्यासून धर्म व राष्ट्रा विषयी अभिमान वाढतो व आपल्या हातून राष्ट्र कार्य घडते.