मनाची शांती




Like
Like Love Haha Wow Sad Angry
6

SilenceSociety means group of humans and every human having problems in their life and its only reason is mental stress or emotional disturbance not only in the society, country but also in the home quarrel between the husband-wife, between the siblings etc and due to this mental stress causes Physical Disease, Restlessness, Insomnia, Suicide. In this situation of stress the humans can lost his mental balance and emotional peace and took harsh decision.

** मनाची शांती आणि समाज कल्याणचा सर्व श्रेष्ठ उपाय — योग
समाज म्हणजेच मानव समूह आणि आज प्रत्येकास काही ना काही समस्यां जरूर आहे, परंतु त्याचे कारण एकच म्हणजे मनातील तणाव ( mental tension ) अथवा भावावेश (emotional disturbance ) समाज ,देश नव्हे तर घरात सुद्धा कितीतरी गोष्टीवर तणाव होऊन पती-पत्नीतील भांडणे, प्रॉपर्टी साठी भावाभावातील भांडणे, घरमालक- किरायदारातील भांडणे अनेक प्रकारच्या मानसिक तणावा पासून शारीरिक रोग, बेचैनी आणि अनिद्रा, आत्महत्या अशी स्थिती तयार होते. या तणावाच्या स्थितीत मनुष्य आपले मानसिक संतुलन तशीच भावनात्मक शांती हरवून बसतो व मनुष्य चुकीचा निष्कर्षावर पोचतो.
** मनुष्याच्या मनाला शांती देणे हि सर्वात मोठी सेवा आहे.
मनुष्य एक मननशील प्राणी आहे. त्यात दूरदर्शिता, धैर्य व बुद्धी चे प्राबल्य आहे. करिता त्याला अनुशासन प्रिय, चिंतनशील, मदतगार असणे आवश्यक आहे. मानवी मनाला शांत, शुद्ध, व संतुलित बनविण्याचे कार्य म्हणजे उच्चं कार्य होय. आणि असाच समाज निर्माण करणे या साठी झटणे यात किती महानता होय. व्यवहारातील मूळ स्थान म्हणजे प्रेम, शांती, धैर्य, संतोष, द्या आणि त्याग हे गुण मनुष्याने आत्मसात केले तरच तो सर्व समस्यांतून मुक्त होऊ शकतो, यासाठी एक समाज-सेवक आर्थिक, सामाजिक, राजनीतिक उपायाने प्रयास करीत आहे.
** मन अशांत का होते ?
मनुष्याच्या नात्यात विषमता येणे. पारिवारीकच नव्हे तर आणिक काही व्यवसायिक संबंध, तर मैत्रीचे संबंध त्यावर सुद्धा मानसिक स्थिती अवलंबुन असते. घरातील व्यक्तींचे तणावपूर्वक वागणे तसेच आर्थिक स्थिती ठीक न होण्याच्या अडचणी इत्यादी बरीच कारणे आहेत मन अशांत होण्याचे.
मानव अन्य जीव-प्राण्यांपेक्षा वेगळा असा धर्मजीवी, सांस्कृतिक, व राजनैतिक प्राणी आहे तेव्हा दुसर्या सोबत धार्मिक, सांस्कृतिक, व राजनीतिक संबंध सुद्धा असतात, तेव्हा भाषा, जाती यातही त्याला लगाव असतोच. तेव्हा सर्वा सोबत त्याचा व्यवहार कसा आहे यावर सुद्धा मानसिक स्थिती निर्भर असते. त्याच्या स्वभावाचा यां सर्व गोष्टींवर प्रभाव पडत असतो.
** संबंध व नाते टिकविणे याचे काही नियम
मनुष्य आपल्या जीवनात विशेष करून या चार बाबींवर लक्ष करावे. १) गुण चिंतन( स्वभाव )
२) धैर्य ३) मैत्री भाव . ४) समाधान ( संतोष )

**
१) गुण-चिंतन ….. दोष दर्शन — नाही — गुण दर्शन
एक मनुष्य दुसर्या मनुष्याच्या संगतीने बिघडने हि परिस्थिती तेव्हाच येते जेव्हा त्याचे लक्ष दुसर्याच्या अवगुणा कडेच जाते. त्याच्या अवगुणांवर तो उत्तेजित होतो व त्याचा तिरस्कार करतो. तेव्हा त्याच्या मनाची प्रसन्नता नाहीशी होते. व्यक्ती बद्दल कटुता निर्माण होते, व त्याबद्दल वैर -पूर्ण आणि व्यवहार स्नेह सुद्धा मिटतो. परंतु मनुष्याने हे समजून घेतले पाहिजे कि प्रत्येक मनुष्यात काही ना काही अवगुण आहेतच, निर्दोष मनुष्य कुणीही नाही, पण हे इतकेच सत्य आहे कि प्रत्येकात काही सद्गुण हि असतात तेव्हा मनुष्याने प्रत्येक व्यक्ती मधील सद्गुणांवर आकर्षित झाले व त्याचेच अवलोकन केले तर मनुष्याला कुठल्याही व्यक्ती कडून बाधा होणार नाही. व प्रत्येकाशी स्नेह वाढेल आणि कटुता निर्माण होणार नाही. मनुष्याने आपल्यातील अवगुणा कडे विशेष लक्ष करून त्यांना दूर केले पाहिजे, अवगुण हे अग्नी स्वरूप आहे ते मनाला जाळतात, बुद्धीहीन बनवितात म्हणून महानता यातच आहे कि दुसऱ्यानं सोबत प्रेमपूर्वक व्यवहार ठेवून त्याच्या अवगुणांना मनातून काढून टाकावे. यालाच गुण-दर्शन म्हणतात. मनाला गुणयुक्त संस्कार द्यावे तेव्हाच जीवनात आनंद भरभरून राहील.

२) धैर्य – बऱ्याच वेळा मनुष्य धैर्य गमावून बसल्यास आपले संबंध बिधडवण्यास कारणीभूत ठरतो. अशा परिस्थितीत तो कुणास हि वेडे वाकडे बोल बोलून वाईट निर्णयावर पोचतो. कधी कुणाची मानहानी अथवा तनहानी करून बसतो.अत: धैर्य एक उच्च्तम मानवीय गुण आहे. तो मानसिक संतुलन टिकविण्यास अतिउत्तम अशी एक औषधी आहे.
३ ) मैत्री भाव – मनुष्य दुसर्याचे गुण गाणं, किंवा स्तुती करतो आणि धैर्य-पूर्ण व्यवहार सुद्धा तेव्हाच करतो जेव्हा ज्यांच्या प्रति त्याच्यात मैत्री पूर्ण भाव बनलेला असतो. मूळ कारण म्हणजे सर्वांना आपले मानणे किंवा आपण सर्व एकाच प्रभु ची लेकरे आहोत असे मानून सर्वांची मैत्री पूर्ण, सदभावना ठेवून व्यवहार केले पाहिजे. आपल्याच घरी एखादी अशी व्यक्ती अवगुणी, किंवा अशक्त असते तेव्हा आपण त्याचे अवगुण सहन करतो, किंवा त्यांना आपले म्हणून मदत करतोच तीच सहिष्णुता आपण दुसर्याप्रति बाळगून व्यवहार केले तर जीवन अगदी सोपे होईल.
४) संतोष – प्रकृतीतून आपल्याला जे काही प्राप्त होत आहे त्यात संतुष्ट असले पाहिजे. तेच आपल्या कर्माची फळ प्राप्ती समजली पाहिजे, आपल्या सामर्थ्यात जेवढी मिळकत आहे तेच आपले आहे असे समजून समाधानी असावे. मनुष्याला कुठल्याही गोष्टीची अति तुष्णा नसावी. ती मनुष्याचा सयंम तोडून चुकीच्या मार्गाला पोचविते. जीवनात अशांती निर्माण केले. म्हणून मनुष्यासाठी संतोष हि सर्वोत्तम गुण औषधी आहे.
……………………………………………………………………………………………………………………….
** मनुष्यातील भूल – चूक
* मनुष्य ईशवरा पासून दूर जातो आणि मनुष्याच्या मनाचा किंवा आत्म्याचा संबंध भगवंता पासून तुटतो, तेव्हाच त्याचे नाते संबंध, मैत्री यात अभाव यायला लागतात आणि त्याचे जीवन ओसाड बनते. मनुष्यातील सद्गुण, धैर्य, संतोष, गुणचिंतन हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी त्याला सर्वात प्रथम प्रभु चिंतन करणे आवश्यक आहे. प्रभु चिंतनातूनच त्याला संतोष, धैर्य प्राप्त होऊनच त्याचे सर्व नाती, संबंध टिकवून राहील व जीवनात आंनद, शांती मिळेल.
* योग – समाज कल्याणचा एक मात्र उपाय
मानसिक तणाव किंवा मनाची शांती प्राप्त करण्याकरिता तसेच समाजातील समस्यां दूर करण्या करिता एकमात्र उपाय म्हणजे योग हाच आहे. पारंपारिक संबंध, स्नेह, सहयोग, त्याग आणि सहिष्णुता मनुष्याच्या जीवनात येण्या करिता प्रत्येकाने योग क्रिया, योग साधना हि केलीच पाहिजे. योग चा अर्थ म्हणजे मानवाचे प्रभु शी नाते व मनुष्याचे मनुष्याशी नाते जोडणे हाच आहे.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
6




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा