Makar Sankranti is maharashtrian festival.Black clothes are given importance during the makar sankranti. Because black clothes absorb heat. Therefore, black saris are worn during makar sankranti. This festival has special significance for newlyweds.
** मकर संक्रांत
संक्रातिच्या वेळी काळ्या वस्त्रांना महत्व दिले जाते.कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळ्या साड्या काळी वस्त्रे बाजारात संक्रातिच्या वेळी भरपूर असतात. नवंविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्व आहे. लग्ना नंतरच्या प्रथम संक्रान्तिला नवविवाहितेला काळ्या रंगाचे वस्त्र खरेदी केली जाते. तसेच त्यांच्यासाठी हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदी-कुंकू साठी बोलवितांत.त्यांना तिळगुळ- हलवा – नास्ता व वाणात उपयुक्त अशी छोटी भेटवस्तू म्हणून देतात. संस्कृतिक दृष्ट्या या सणाला फार महत्व आहे. लोक हि ऐकमेकांना तीळ-गुळ हातावर देऊन ” तिळगुळ घ्या व गोडगोड बोला’ असे म्हणतात. आपले आपापसातले भांडण किंवा गैरसमज, वैरत्व दूर करून पुन्हा स्नेहाचे,व सलोख्याचे संबंध निर्माण करण्या करिता हि फार मोठी संधी असते. आपसातील विध्द्लेले नाते किंवा संबन्ध अधिक दृढ होतात. लहान मुलांची ‘ बोरनहाण’ (लूट) करतात त्यांना नवीन कपडे हलव्याचे दागिने घालून पाटावर बसवून त्यांच्यावर सुका खाऊचा वर्षाव करतात, घेतील व सभोवतालची बालगोपाळ बोलावून तो वर्षाव केलेला खाऊ आपल्याला मिळावा म्हणून हात उंचावून घेण्याचा प्रयत्न करतात. गोळा करून त्याचा आनंद घेतात.