प्रेम कुणाला अर्पावे?




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Today, everywhere people running behind the artificial facts, no one knows the fact of true love and who should we love more. We look everywhere that the new generation’s trend is attracting artificial facts by creating artificial beauty in the heart. There is no time to take note of the fact that he has forgotten the meaning of real life.  Love is where the soul is. This article will guide you the importance of real soul and whom we should love more. 

Real vs articifial

आज सर्वत्र भौतिक वाद वाढत असून त्याचे रूपांतर काहीसे जीवघेण्या स्पर्धेत होत आहे. आपण सर्वत्र पाहतो कि ,कृत्रिम सौन्दर्याचे आवरण  अंत:करणात उत्पन्न करून नवी पिढीचा कल रजोगुणाकडे आकर्षिला आहे.  वास्तविक जीवनाच्या अर्थाचा विसर पडल्यामुळे तो लक्षात घेण्यास वेळच उरला नाही. परंतु तो लक्षात घेणे फार गरजेचे आहे. संत म्हणतात-  ज्ञान,सत्य, आचरण,प्रेम हेच वास्तविक जीवन होय. प्राणी मात्राच्या अंतर्यामी जो निवास करतो त्या ईशवराला आपण ओळखतो त्याला आळविणे म्हणजेच प्रार्थना करणे होय.  त्याचे प्रेम सर्वोत्तम आहे. जेथे आत्मा आहे तेथे त्याचे प्रेम आहे.

त्या प्रेमाला धन, संपत्ती,वैभव या पोकळ वस्तूशी जोडल्या जात नाही. या प्रेमाने अंतर्मनातील विकाराची घाण धुऊन निघते.  त्यासाठी ज्याने हे प्रेम दिले त्याला आळवावे लागते त्याचे स्मरन करावे लागते. केवळ भ्रमण करून मोठमोठ्या यात्रा करून नदीवर शरीर स्नान करून अंतर्यामी विकार धुवून निघत नाही.  परंतु वर्तमानात प्रेमासारख्या भावनेचे माप देखील पैसा झाला आहे.  प्रत्येक वस्तू पैशाच्या मोलाने मोजण्याचा सराव झाला आहे. त्यामुळे जिकडे तिकडे पैसाच दिसतो. बाकी दिसेनासे झाले आहे. प्रेमाची देवाण-घेवाण माणूस विसरला आहे.

याचा परिणाम असा की मनुष्याला जीवनात नवे मित्र नकोत,कुणा कडे जाणे नको कुणाला घरी बोलावणे नको,फ्ल्याट मधील जीवन शेजारी शेजार्याला ओळखत नाही, आणि हेच अनुकरण पुढची पिढी करीत आहे. आणि मुख्य कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीचा जन्म झाला. आज सारा व्यवहार असा झाला कि  क्लब, पार्ट्या, चैन, सुख या मागे व्यक्ती घावतो आहे. घर घर राहिले नाही ते गेस्ट हाऊस झाले आहे.  कुटुंब म्हणजे  ‘हम दो हमारे दो या एक ‘ एवढेच. आई कुठे जाते, वडील  कुठे जातात, कुणाचा कुणाला पत्ता नसतो. बहिणीला भाऊ नको, भावाला बहिण नको, घरात प्रेम समजून घ्यायला किंवा विस्तृत करण्यास घरात जेष्ठ, श्रेष्ठ कुणी मंडळी नाहीत, मुलांचे काय दोष ? आपणच त्यांना संकुचित करून टाकले आहे, प्रेम कुणावर कसे करायचे ? याची जाणकारी द्यायला आई-वडील यांना मुलांसाठी वेळ नाही. मग हि मुले टी.व्ही, नेट, गुगल यांच्या माध्यमातून  प्रेमाचे माध्यम शिकू पाहतात, तिथूनच प्रेमाच्या आगळ्या वेगळ्या कहाण्या जन्मास येतात. हि मुले बाहेर जाऊन सोबती शोधतात.आणि वाईट संगतीने जीवनाची गाडी घसरते.

whom should we love more

आई वडिलांनी मुलांचे मित्र बनले पाहिजे. त्याचे सांगाती कोण आहेत्यांना घरी बोलावून त्यांच्याशी परिचय, करून संवाद साधावा. मुलांना प्रेम देण्याची तितकीच आवश्यकता आहे.  आपल्या संस्कृतीत प्रेमाचे तितकेच सण आहे. एकमेकांना प्रेम वाटण्यासाठीच सणांची निर्मिती झाली आहे. सणामुळे संस्कृती टिकून राहते. ‘प्रेम’ ईशवराची देणं आहे.  सर्वां सोबत ‘प्रेमपूर्वक’  जीवन जगले पाहिजे.  प्रेम विशाल असले पाहिजे हि विकाराची गोष्ट नाही.

 लपून लपून अंधारात करावे लागणारे प्रेम  ते प्रेम नव्हे हे तरुण तरुणीनं मधील प्रेम नैसर्गिक प्रेम नव्हे, प्रेम नैसर्गिक रित्या होत असते. प्रेमाच्या व्याख्येला बंधन असले तरी  ती काही वस्तू नव्हे. आनंद देणारी हि नैसर्गिक भावना आहे.  कुटुंब, समाज यांचे देखील प्रेमाचीच नाते असतात. आदर सम्मान, जिव्हाळा आणि आत्मीयता यां बाबी प्रेम याभावने  सोबत जोडलेल्या असतात.  प्रेमात प्रामाणिक पणा महत्वाचा असतो. प्रेमाची जाणीव, व त्यांची परिभाषा फार मोठी असते, आत्मसम्मान शाबूत ठेवून शहाणपणाने प्रेम करावे  प्रेम हि एक भावना असली तरी त्यामागे वात्सल्य, आदर, काळजी, आवड, या बाबी देखील असतात .  प्रेमाने माणूस जडतो. प्रेमात सामर्थ्य आहे.  कधी प्रेम सांगता, बोलता, दाखविता येत नसले तरी  भावना आणि विचार यां वरून प्रेम ओळखायला वेळ लागत नाही.  बुद्धीचा अंतिम विचार सत्य शोधण्याचा आणि अंत करणाचा अंतिम विकास म्हणजे प्रेम होय. यां अंतिम विकासासाठी परमेशवराला आपल्या भक्तीच्या ‘प्रेमळ’ दोरीने बांधून घ्यायला पाहिजे  हेच योग्य होय.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu