Today, the world run behind the manipulations as the antelope in the summer. In times of stress, many people have gone far away from the peace of mind, and they make the person abominable by cooperating with the instinctive attitude of them. Regardless of who we are, we get ridiculous in life and make life happy. Due to happiness, it means that all wicked people should be gentlemen and get peace with the gentleman. This article will teach you how to get stress away from you.
आज सर्व जग भौतिक वादा कडे झुकत असून उन्हाळ्यात उत्पन्न होणाऱ्या मृगजळा प्रमाणे माणूस बनावटी सुखाच्या मागे धावत सुटला आहे. या धकाधकीच्या काळात अनेक जण मनाच्या शांती पासून कोसो दूर गेला असून माणसाला त्यामधील दृष्ट प्रवृत्ती सहकार्य करून त्याला दुराचारी बनविते. शावेळी निरंतर-निराकार परमेशवराचे समरण केल्यास परमार्थ रुपी संसार करणे सहज शक्य होते. आपण कोण याचे नित्य भान असणे म्हणजे जीवनातील बेतालपणा जातो आणि जीवन सुखी होते. प्रत्येक सुखाचे प्रगटन शरीराद्वारे होते आणि ते होण्यासाठी शरीरास काही दुःखे सोसावी लागतात. अंत करणात दडलेल्या प्रकाशमय आत्म्याला ओळ्खल्यास मनाची शांती होते आणि सुख समाधान लाभते. प्रत्येकाला सुख हवे असते सुखाचा आनंद जीवनात आला म्हणजे तोच माणूस साधा सा,सामान्य जीवन जगणारा सरळमार्गी होतो. मन अपूर्व शांततेनेओतप्रोत भरून जाते. मनुष्य जीवनात दु:ख अटळ आहे, परंतु दु:ख होणे आणि दुखी असणे यात फरक आहे. दुःख जीवनात आल्या शिवाय सुखाचे महत्व कळत नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतः;विकासासाठी शारीरिक,मानसिक,अध्यात्मिक सुदृढतेची गरज असते. जीवनाचा अर्थ काय? ते जगण्याचा चांगला मार्ग कोणता, किंवा मानवी जीवनाची उकल करण्यासाठी. आपल्या पूर्वजांपासून, साधू, संत, ऋषी, मुनी या अनेकांनी नेहमीच धडपड केलेली आहे. या सर्वां मध्ये सम्यक दृष्टी प्रदान करण्याची क्षमता होती.
सुखाचे आगर याचा अर्थ सर्व दुर्जन सज्जन होवोत, सज्जनाला शांती मिळो. शांत व्यक्ती बंधनातून मुक्त होवो. आणि जो मुक्त आहे तो इतरांना मुक्त करो. परंतु हे सर्व घडण्यासाठी प्रत्येकाला सुसंस्काराची आवश्यकता असते.
चित्ताला सुसंस्कारित केले म्हणजे मन जो आपला शत्रू आहे तो सखा व मित्र बनतो. जीवनात स्वतः:चे व्यक्तिमत्व, आवडी, निवडी व कौशल्य तपासणे आवश्यक आहे. आपण वर्तमान सोडून भूतकाळात रमून भविषयाची स्वप्ने रंगविण्यात गुंग असतो भविष्याच्या चिंतेमुळे श्रेष्ठ अशा वर्तमान काळाला विसरून जातो. त्यामुळे सुखा ऐवजी दुःखाचे ओझे पाठीवर घेतो आणि नशिबाचा खेळ म्हणत आपण आपले कर्तव्य विसरून जातो. संतांच्या मते आपल्याला सुखच सुख मिळाले कि आपल्या प्रगतीच्या दिशेनी होणारी वाटचाल थांबून आपल्याला जडत्व येते, हृदय संवेदनशील राहात नाही ,ते बधिर होते परंतु आपणाला अधून मधून दुःख व वेदना येत असतील तरच आपल्याला अस्तित्वाची जाणीव राहते, आपण जीवंत आहोत याची जाणीव राहते. आपणारा क्रिया जरी बदलता येत नसल्या तरी त्यामागील हेतू बदलला कि मांगल्य आणि सुख निर्माण होते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य असणे हे देखील ‘सर्व सुखाचे आगर’ होय. म्हातारपण, मृत्यू हे सर्वांनाच आहे, ह्याचा अगोदर पासून विचार करीत, हसत, खेळत जीवन जगणे , हेच सुखाचे लक्षण होय. आपण जेव्हा झोपी जातो व स्वप्न पहातो तेव्हा असे वाटते कि जीवन सुखाचे आगर आहे. जागेपणी मात्र जीवन हे सेवा आहे,सेवेच्या दिशेने गेलो तर पुन्हा सुखाचा आनंद मनुष्य अनुभवतो. याचा अर्थ असा कि जीवनाची दिशा ठरवून जर जीवन जगाल ‘ तर आनंदी आनंद घडे’ सारखी स्थिती निर्माण होते. म्हणून संत म्हणतात विचार बदला म्हणजे आयुष्य बदलते.
परंतु सघ्या च्या घडीला सुख हे यांत्रिकी झाले आहे घरात जितक्या सुखसोयीं ची साधने असतील तितकाच मनुष्य सुखी हेच समीकरण झाले आहे. सुखाचा संबंध पैशाशी जोडला गेला आहे. पैशाच्या बळावर सर्व कामे दुसर्याकडून करून घेणे, हेच यशस्वी जीवनाचे गमक मानणे, यात कितीही बुद्धी चातुर्य , किंवा व्यवहार कुशलता असली तरी यात धर्म कुठेच नसतो. या सर्व गोष्टींत सुख दिसेल पण ते भौतिक सुख म्हणावे. या सुखमय जीवनाला आदर्श जीवन मानून याच भ्रमात कित्येक लोक आहेत,परंतु समाजासमोर तमोगुणाचा आदर्श ठेवून हे लोक स्वतः:चे नुकसान करून घेतात. व दुर्र्यांनाही अधर्माकडे नेण्याचे पातक करतात. भ्रष्टाचाराचे भूत फार पुढे आले आहे हे सुद्धा भौतिक सुखामुळे, सर्व सुख सोयी मिळविण्या साठी मनुष्य सतत त्याकरिता धावपळ करीत असतो. साम, दाम, दण्ड, भेद कोणत्याही मार्गाने का होईना पण पैसा मिळवायचाच.
संसारा करिता धावपळ असतेच पण संत म्हणतात माझ्यातला मी ओळखला व सामाधानी वृत्ती ठेवून सर्व भार परमेशवरावर ठेवून कर्म करीत राहिले तर त्यातून मिळणाऱ्या आंतरिक व अध्यात्मिक सुखाची बरोबरी कोणतेही सुख करू शकत नाही. म्हणून भौतिक जग हे सुखाचे सोबती असून दुःखात साथ फक्त परमेशवराचाच असतो. कधी दुःख आजाराने येते पण त्याचे कारण म्हणजे चुकीचा व फाजील आहार होय. ताजे, रसाळ, स्निग्ध, आरोग्यपोषक अशा आहाराने सुख आणि प्रेम वाढते जगात सर्वसुखी कोणीच नाही परंतु आलेल्या परिस्थितीवर धीरोदत्तपणे सामना करायला पाहिजे. आपण जे काही कर्म करतो त्या कर्माचे चांगले वाईट फळ आपल्याला भोगावी लागतात, त्याकरिता बुद्धी जागृत ठेवली पाहिजे. संत म्हणतात जीवनाचा एकमेव हित परमार्थ प्रीती व यासाठी मनाची एकाग्रता व शुद्ध कल्पना मनात असेल तरच अशुद्ध कल्पनांचा नायनाट होतो. चांगला वाईट फरक समजून घ्यावा. संसारिक सुखाच्या पाशात गुंतू नका. त्यातून हि परमार्थास वेळ काढा सदैव हरिनामाचे चिंतन करा. सदैव हरिनामाचे पठण करणारा . सर्वांगाने सर्वोत्तम असून त्याचे शरीरच ” सर्व सुखाचे आगर होय” .