Ashadhi Ekadashi :
Ashadhi Ekadashi also known by various names like Padma Ekadashi, Maha-ekadashi and Devpodhi Ekadashi. Ashadhi Ekadashi is one of the most important religious celebrations in Maharashtra. Read to know the story of Ashadi Ekadashi fasting. Get Complete information About Marathi Festival Ashadhi Ekadashi.
आषाढी एकादशी या सणा मागची पौराणिक कथा अशी कि ‘ मृदुमान्य’ नावाच्या एका राक्षसाने भगवान सदाशिवाची उपासना करून ‘तुला कुणा कडूनही मरण येणार नाही’ असा वर मागून घेतला. व पुढे त्याने सर्व देव जिकंण्याचा निश्चय केला. व त्यांच्यावर आक्रमण सुद्धा केले. तेव्हा ब्रम्हा, विष्णू, महेश हे देव गुहेत लपून बसले. तरी त्या राक्षसाने त्याकाळींचा शोध घेतला व तो राक्षस गुहेच्या तोंडाचीच राहिला त्यामुळे त्यांना तेथून निघताच येईना तेथे त्यांच्या श्वासातून एक देवता उत्पन्न झाली. तीच हि एकादशी होय तिने त्या मृदुमान्य राक्षसाला ठार मारले. त्याच या एकादशीला निरंकाळ उपवास करतात. याच दिवसां पासून चातुर्मास सुरू होतो. या चातुर्मासात धार्मिक लोकदेवाच्या भक्तीसाठी काही संकल्प, नियम करतात. काही व्रते, तर धार्मिक पुस्तकाची नियमित वाचणे, हे चार महिने ते नित्य पाळतात. महा विष्णूची पूजा करतात, एकादशीच्या दिवशी गंगस्नान करतात. श्री विष्णूला तुळशी वाहतात. सारा वेळ भजन-पूजनात घालवतात.
याच दिवशी ज्ञानदेवांची पालखी सोहळा सुद्धा होतो. महाराष्ट्रातील ज्ञानदेव या महान संतांशी एकादशीचा अतूट संबंध जोडला गेला आहे. एकादशीच्या सुमारे वीस दिवस अगोदर आळंदिहुन ज्ञानदेवांच्या पादुका पालखीत घालून दिंडी बरोबर चालत वारकरी पंथ त्या पादुका पंढरपूरला नेतात. या दिंडीत सहभागी होणाऱ्या भक्तांना वारकरी म्हणतात विट्टलाच्या भक्तीत तल्लीन झालेले वारकरी एकतारी व टाळ व झान्जा च्या तालावर तुकोबा व ज्ञानदेवांचे अभन्ग गात गात हि पालखी खांद्या वरून पंढरपूर पर्यंत चालत नेतात. गळ्यात तुळशी माळा व कपाळी गंध टिळा लावून आंनदाने वारी करतात. असा हा भक्तीचा महिमा कालांतराने चालूच आहे. पंढरपूरला या यात्रेचे सुंदर स्वरूपच आलेले पहायला मिळते. तसेच महाराष्ट्र्भर गावोगावच्या विठ्ठल मंदिरांत हा सोहळा असतोच. या दीवशी उपवास करतात. देवाला फराळी नैवद्य दाखवून पूजा अरचा होते. कीर्तन, भजनात हा दिवस घालवितात. महाराष्ट्राच्या संत सांप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यन्त महत्वाचा सण आहे.