आचार्य चाणक्य उवाच




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Thoghts of Chanakya –

Chanakya was an Indian teacher, philosopher, economist, jurist and royal advisor. Aacharya Chanakya is traditionally identified as Kautilya or Vishnu Gupta.

Thoghts of Chanakya

विवेकाची कास धरून कर्म करावे :

परमेश्वराने जन्माला घातल्या नंतर या पृथ्वीतलावर प्रत्येकाने कसे वागावे आपले कर्म कसे असावे हे ज्याने त्याने ठरवायचे असते. आचार्य चाणक्य म्हणतात –  ” तुम्ही जसे कर्म करता त्या कर्माप्रमाणे तुम्हाला त्याचे फळ मिळते. चांगल्या कर्माचे चांगले तर वाईट कर्माचे विपरीत. कारण जसे कर्म तुम्ही करता त्या प्रमाणे तुमच्या बुद्धीची ठेवण होते. म्हणून  नेहमी विचार सुद्धा चांगल्या कर्माचा करावा. या तत्वाप्रमाणे विद्वान आणि सज्जन माणसे प्रत्येक कर्म हे विचार करून, विवेकाची कास धरून करतात. मग त्या प्रमाणे फळ प्राप्त होऊन  जन माणसात त्यांना प्रतिष्ठा मिळते.

चाणक्य उवाच :

आचार्य चाणक्य म्हणतात, माणसाला त्याचे जीवन सुंदर बनवायचे असेल, परमेश्वराने दिलेला मनुष्य जन्म सार्थकी लावायचा  असेल तर विवेक, विचार आणि संयम या तीन गोष्टी त्याने आत्मसात केल्याच पाहिजे. विवेक नसला तर माणूस कोणतीही गोष्ट करताना वाहवत जाउन स्वत;चे  नुकसान करून घेईल. जसे हातात मुबलक पैसा आहे, पण भविष्याचा विचार न करता मनावर ताबा न ठेवता हवा तसा पैसा खर्च केला तर तो नष्ट होतो. कोणतीही कृती करताना विचार करून मगच काय करायचे ते ठरवावे. आपण एकटे आहोत कुणी साथीदार किंवा मित्र नाही अश्या वेळी कुणाशी मारामारी किंवा युद्ध करणे म्हणजे अविचाराने संपण्या सारखेच आहे. तसेच स्व्च्छ चारित्रासाठी संयम आवश्यक आहे. तो नसेल तर जीवन व्यर्थ आहे. तेव्हा सारासार विवेकाने, विचाराने आणि संयमाने कृती केल्यास मानवी जीवनाचे सार्थक होईल.

विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा :

विद्यार्थ्याने कोणकोणत्या गोष्टीं पासून दूर राहावे. हे सांगताना आचार्य चाणक्य म्हणतात – विद्यार्थ्याचे सर्व लक्ष अभ्यासात व संस्काराने परिपूर्ण होण्याकडे असले पाहिजे. कारण पुढील आयुष्याची एक व्यक्ती म्हणून जडण-घडण त्याच काळात होत असते. त्याकरीता विद्यार्थ्याने अनेक गोष्टींपासून दूर असणे महत्वाचे त्या म्हणजे काम, क्रोध, लोभ, स्वार्थ, तमाशा, जास्त झोप, अति आहार, शृंगार आणि अति काम करणे या गोष्टी आभ्यासावरील लक्ष उडविणाऱ्या असल्यामुळे या गोष्टींचा विचारही मनात आणू नये. तसेच कुठल्याही व्यसनाच्या आधी जावू नये. कारण गुणवान विद्यार्थी सुद्धा वरील गोष्टींच्या सहवासाने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतो.

विद्या आणि सुगंध असणे महत्वाचे !

आचार्य चाणक्य यांचा अधिकार अनेक विषयांवर होता, प्रत्येक विषयांवर ते अनुभव संपन्नतेने उपदेश करीत असत. ‘ जे आपणासी ठावे ते…’ या उक्ती प्रमाणे त्यांच्यात असलेला ऎक उत्तम शिक्षक समाजाला सजग करण्यासाठी सतत ध्द्प्द्ताना दिसतो. विद्देला त्यांच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व होत. हे महत्व पटवून देताना ते म्हणतात – ”रूप आणि तारुण्य या गोष्टीची संपन्नता असेल, जन्म उच्च कुळात झाला असेल, आर्थिक सुबत्ता सुद्धा असेल तर अश्या व्यक्तींना श्रेष्ठ समजायचे  का?  तर नाही कारण ईतक सर्व जवळ असून जर शिक्षण ( विद्या) नसेल तर ईतर या गोष्टींना काही एक किंमत नाही. जसे सुंदर रंगाच चाफ्याच फुलं आहे पण त्याला सुगंध नाही तर त्या फुलाला काय मोल? त्याच प्रमाणे अशिक्षित मनुष्याला समाजात कशी किंमत मिळणार ?

दान हे सत्पात्री असावे :

असे म्हणतात कि ‘दान हे सत्पात्री करावे ”जिथे तुमच्या देण्याची खरच गरज आहे. तिथेच दान करावे. तेच योग्य दान होय. नाहीतर तुमचे दान निरुपयोगी ठरू शकते. योग्य जागी योग्य कर्म केले तर ते विस्तारत जाते त्याची वाढ होते हेच तत्व चाणक्य सांगतात. ‘ आपण कुणाला काय द्यायचे याचा योग्य विचार करूनच द्यावे.’ सत्पात्री म्हणजे योग्य ठिकाणी दिलेले दान, किंवा योग्य विद्यार्थ्याला दिलेले शास्त्राचे ज्ञान हे त्या विद्यार्थ्याच्या हुशारीने नेहमी वाढतच असते. अशी ज्ञानाची वृद्धी होणे आवश्यक आहे तसेच कुठल्याही प्रकारातील दान असोत ते योग्य ठरले पाहिजे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu