Nari Stri Mahila
We know that how important the women is. One of the famous saying is “Behind every successful man there is a women”. Women prefer to share and care more, she would discuss and figure out a solution for a problem which they face by discussing it with others. Read Full Story on Marathi unlimited.
विश्व-संसार मध्ये सर्व महापुरुष्यांनी ‘स्त्री’ मध्ये तिच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन केलेले आहे. ज्यामुळे ती पुरुष्याला पूरकच नव्हे तर उन्नती, प्रगती आणि कल्याणकारी ठरलेली आहे. स्वत: प्रकृतीने नारी रूपाने सृष्टी निर्मिती करून त्याचे पालन-पोषण, भरण, संवर्धन चे काम केलेले आहे. स्त्री हि सुधारण्याचे काम करते बिघडविण्याचे नाही. परिस्थिती वश ती उग्र किंवा कठोर रूप धारण करीत असली तरी ती कोमलतेच्या कधीच दूर नसते. पृथ्वी दिसायला कितीही कठोर दिसत असली तरी ध्यैर्यवान शांत, आणि सहिष्णुताशिलतेची प्रतिमा आहे त्याचप्रमाणे स्त्री सुद्धा वेळेपुरती कठोर बनते.
स्त्री च्या कोमल,शांत, आणि सहिष्णुता या स्वभावामुळे पुरुष्याने तिला निर्बल किंवा अबला मानून तिला अपमानित केलेले आहे. पण ते हे जाणत नाहीत कि तिच्या या स्वभावातच मनुष्याचे कल्याण आहे. कारण जननी शिवाय या संसारात कोणती अशी हस्ती आहे काय कि शिशु ची सेवा, त्याचे पालन-पोषण करू शकेल त्याचे एक मात्र श्रेय फक्त मातेलाच ( स्त्रीला ) जाते. नारी हीच निर्मात्री शक्ती आहे.
‘स्त्री’ हीच एक अशी शक्ती आहे ती विभिन्न रुपात मानव जातीसाठी त्याग, बलिदान, स्नेह, श्रद्धा, धैर्य, सहिष्णूतेचे जीवन स्वीकार करू शकते .
आई-वडील किंवा कौटुंबिक जेष्ठधार्यांसाठी आत्मीयता, सेवेची भावना जेवढी मुलींमध्ये असते अन्यत्र कुणातही नसते. मुलगी लग्नानंतर दुसऱ्या कुटुंबात जरी गेली असली तरी आई वडिलांपासून कधीच दूर होत नाही. तिच्यात परकेपणा कधीच येत नाही. पूर्वी पेक्षा अधिकच आपलेपणा निर्माण होतो. भाऊ- बहिणीच नातं किती पुण्य-पवित्र, आदर्श-श्रेष्ठ आहे. ते दूर तर होतात परंतु बहीण भावाचे अहित करू शकत नाही, ती त्याच्या करीता शुभकामनाच करेल. त्याच्या भल्याचीच इच्छा प्रगट करील. तसेच आईसारखे दुसरे कुणीच मुलाचे हितचिंतक नाही. संसारचे सर्व लोक तोंड मोडतील परंतु आई कितीही संकटे समोर असतील तरी मुलावर त्याची सावली देखील येऊ देणार नाही. मुलाच्या हिताकरीता ती काहीही करायला तयार होईल.