bhoopali pandhuranga-This is a type of aarti called bhoopali.This bhoopali sung in the worship of God Pandhuranga.
उठा पांडूरंगा आता प्रभात समय पातला | वैष्णवाचा मेळागरुड पारीं दाटला||
गरुड पारांपासुन महाद्वारपर्यंत | सुरवरांची मांदी उभी जोडूनियां हात||
शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी | त्रिशूल डमरू घेऊनि उभा गिरिजेचा पती||
कलियुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी | पाठी मागे उभी डोळा लावूनिया जनी||