|| आरती त्र्यंबकेश्वराची ||




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Shri Trimbakeshwarachi Aarti – “Trimbakeshwar aarti” is sung to worship Lord Shiva. It’s a traditional aarti of the famous temple known as Trimbakeshwar temple having the twelve Jyotirlingas. Jyotirlingas have Shiva as the main deity.

hqdefault (1)

जय जय त्र्यंबकराज गिरीजानाथा गंगाधर हो, त्रिशूलपाणी शंभोनीलग्रीवा शशी शेखरा हो|

वृषभारूढा फणीभूषणा दशभूज पंचानना हो, विभूती माळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो || धृ ||

पडलें गोहत्येचे पातक गौतम ऋषींच्या शिरी हो, त्यांनें तप मांडीले ज्ञाना आणुनी तुज अंतरी हो|

प्रसन्न होवुनी त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो, औदुंबरमूळीं प्रकटे पावन त्रैलोक्यातें करी हो ||१||

धन्य कुशावर्ताचा महिमा वाचें वर्णू किती हो, आणिखी बहु तीर्थे गंगाद्वाराधिक पर्वतीं हो|

वंदन मार्जन करितां त्याचें महादोष नासति हो, तुझिया दर्शन मात्रे प्राणी मुक्तिं तें पावतीं हो ||२||

ब्रम्हगिरीची भावें ज्यालां प्रदक्षिणा जरी घडे हो, तैं तैं कायां कष्टें जंव जंव चरणीं रुपती खडे हो|

तंव तंव पुण्य विशेषे किल्बिष अवघें त्यांचे झडे हो, केवळ तो शिवरुपी काळ त्यांच्या पाया पडे हो||३||

लाऊनिया नीज भजनीं सकळ हि पुरविशी मनकामना हो, संतती संपत्ती देसी  अंती चुकविशी यमयातना हो|

शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो, गोसावी नंदन विसरे संसार भव यातना हो ||४||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu