||श्री पंचायतनाची आरती||




Shri Panchayatnachi Aartri-The Panchaytnachi Aarti is sung to worship Lord Ganesha also known as Ganpati and Vinayaka. He is widely revered as the removal of obstacles.

Ganpati-Seated-On-A-Red-Flower-DecoJunction-31

जयदेव जयदेव जय सुखकर मूर्ती | गणपती शिवहरीभास्कर अंबा सुखमुर्ती || धृ ||

अधसंकटभयनाशन सुखदा विघ्नेशा | आध्या सुरवरवंद्या नरवारनवेषां |

पाषांकुशधर सुंदर पुरविशी आशा | निजवर देउनि हरीसी भ्रांतीच्यापाशा ||१||

नंदी वहना गहना पार्वतीच्या रमणा | मन्मथदहना शंभो वातात्मजनमणा |

सर्वोपायविवर्जित  तापत्रयशमणा | कैलासाचलवासा करिती सूरनमना ||२||

पयसागरजाकांता धरिणीधरशयना | करुणालय वारिसी भववारीजद्लनयना |

गरुडध्वज भजनप्रिय प्रभू पीतवसना | अनुदिनीतव कीर्तनरस चाखो हे रसना ||३||

पद्मप्रबोधकरणा नेत्रभ्रम हरणा | गोधनबंधनहरता द्योतक आचरणा |

किरणस्पर्शेवारिसी या तम आवरणा | शरणागतभय नाशक सुखवर्धन करणा ||४||

त्रिभुन उत्पत्ती पालनं करिसी तू माया | नाही तुझियां रूपा दुसरी उपमा यां |

तुझा गुणगाण महिमा न कळे निगमा यां |करुणा करिसी अंबे मनीं विश्रामा यां ||५||

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड