Shri Akkalkot Swamichi Aarti-This is a marathi aarti sung in the worship of Akkalkot Swami Maharaj also known by the name Swami Samarth Maharaj.He was a Indian guru of dattatreya tradition. Get full Arti of Shri Akkalkot swami Maharaj in Marathi.
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेऊनिया माथा||धृ||
छेली खेडे ग्रामी तुं अवतरलासी,जग उद्धारासाठी रायां तुं फिरसी|
भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुझ्या चरणासी || १||
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार त्याची काय वर्णू लीला पामर|
शेषादिक शिणले न लगे त्यां पार, तेथें जडमूड कैसा करू मी विस्तार||२||
देवाधि देवा तू स्वामीराया, निर्जर मुनिजन ध्यासी भावें तव पायां|
तुजसी अर्पण केलीं आपुली काया, शरणागत तारी तुं स्वामीराया||३||
अघटीत लीला करुनी जडमूड उद्धरिलें कीर्ती ऐकुनी कानीं चरणी मी लोळें|
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवलें, तुझ्या सुता नलगे चरणां वेगळें ||४||