||पंढरीनाथाची आरती||




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Pandharinathachi Aarti-Pandharinathachi Aarti is a marathi aarti sung in the worship of God Pandhuranga also known bye the name of Vitthala and Vithoba.The most important festivals of Vithoba are held on the Ekadashi day in the month of Aashadha and Prabodhini Ekadashi in the month of Kartik at such days this aarti is sung by the devotees of God vithoba. Marathi Unlimited is the Unique source of All devotional Artis in Marathi.

Vitthal-Rukmini-Back-To-Godhead

जगदीश जगदीश देवा तुजं म्हणती,प्रिया जनामाजी देशील मुक्ती |

पुण्यपापविरहीत सकळां अधिपती,उदकीं नलिनी तैसा अलिप्त तुं जगतिं ||१||

जयदेव जयदेव जय पंढरीनाथा  न उरे पाप विठ्ठल म्हणतां सर्वथा ||धृ||

आगम निगम तुज नेणती कोणी, परी तुं भाव भक्ती जवळीच दोन्ही|

नेणतां विधियुक्त भावें पुजुनि, न माये ब्रम्हांडी तो संपुष्टशयनीं ||२||

असुरां काळ भासे विक्राळ पुढें, पसरी मुखे एक चावितों धुंडे|

भक्त शरणागत चालतों पुढें, दावी वाट जाउं नेदी वाकूडे||३||

एका एकी बहु विस्तरला सुखें, खेळे त्याची लीला तोचि कवतुकें|

तेथें नरनारी हीं कवण बाळकें, काय पापपुण्य कवण सुखदु:खें ||४||

सकळां वर्मांतुंचि जाणसी एक,बंधमोक्ष प्राप्त आणिक सुख दु:ख|

जाणों म्हणतां तुंज थकलीं बहुतेक, तुका म्हणे शरण आलों मज राख ||५||

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा