Makka Kachori is the indian snack. This tasty snack can be made using various types of stuffings and different methods. Here , is the recipe of Makka Kachori that is not only tasty but also have nutritional values and health benefits also.
कचोरीसाठी साहित्य :- १०० ग्राम मक्याचे पीठ, दोन चमचे कसुरी मेथी, मीठ चवीनुसार
सारण साहित्य :- ५० ग्राम पनीर किसलेला, अर्धी वाटी हिरवे मटार दाणे उकळलेले, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर अर्धी वाटी बारीक चिरलेली, तिखट, मीठ, हलकासा गोडा मसाला चवीनुसार, एक चमचा चाट मसाला, तळणासाठी तेल.
कृती :- १. मक्याचे पीठ, कसुरी मेथी व चवीनुसार मीठ कोमट पाण्याने भिजवून दहा मिनिटांनी त्याचे लिंबाएवढे गोळे करून घ्यावे.
२. सारणाचे सर्व साहित्य एकत्रित करून मिसळून घ्यावे.
३. नंतर तयार असलेल्या एका गोळ्याला हातात घेवून वाटी तयार करून त्यात मोठा चमचा सारण भरावे व पूर्णत: बंद करून चपटा आकारात करून घ्यावे. याप्रमाणे सर्व गोळे तयार करावे.
४. त्यानंतर ते सर्व गोळे गरम तेलात मंद आचेवर तांबूससर तळून घ्यावे. हिरवी मिरची किंवा टमाटो सॉस सोबत सर्व्ह करावे.