गृह शास्त्र–गृहलक्ष्मी

Like Like Love Haha Wow Sad Angry Gruha Shastra–Gruhlaxmi – The Gruha Shastra and Gruhlaxmi both are related to each...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Gruha Shastra–Gruhlaxmi –

The Gruha Shastra and Gruhlaxmi both are related to each other. The relationship of  Gruha Shastra and gruhlaxmi don’t change no matter how changed the time because there are still those who are having the responsibilities of their houses.

Gruha Shastra--Gruhlaxmi

 

काळ कितीही बदललेला असला तरीही गृहशास्त्र व गृहलक्ष्मी हे बदलायला नकोत. कारण गृहलक्ष्मीवरील ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या अजूनही कायम आहेत. स्त्री पैसा कमविण्या करीता बाहेर पडली असली तरी तिला तिच्या गृह शास्त्रात बदल करून चालणार नाही.

गृहस्थाश्रमात स्त्री हि पुरुषाचे अर्धांग आहे.म्हणून पुरुषार्थ सिद्धीला ‘सुई मागे दोरा’ या प्रमाणे स्त्रीची साह्यता पुरुषाला अवश्य हवी. शुभ कार्यात,धर्म कार्यात,किंवा कोणत्याही योग्य कार्यात उभयतांचा एक जीव,एक विचार पाहिजे. म्हणूनच तिला धर्मपत्नी म्हटले जाते. तसेच ‘गृहिणी’ हीसुद्धा उपमा दिल्या गेली आहे. अर्थात घरातील कामाची जबाबदारी स्त्रीवर आणि बाहेरच्या कामकाजाची जबाबदारी पुरुष्यावर असेच गृहशास्त्र सांगते. परंतु आजच्या काळात संसार म्हटले कि बऱ्याच अडचणी येतात हे आज आपण बघतच आहोत, तेव्हा काळानुसार स्त्रीला घराबाहेर पडणे भाग पडले. मात्र गृहशास्त्रात बदल घडवून बरेच कार्य बिघडताना सुद्धा आपण बघत आहोत.

लज्जा,विनय,मर्यादा,शील,पतीव्रत्य, प्रसंगावधान,शांतचित्त हे कुलवान स्त्रियांचे उपजत अंग स्वभाव असायलाच पाहिजे,तसेच बाल संगोपन,पाकशास्त्र,प्रसंगावधान व्यवहार यांची माहिती असणे आवश्यक आहे. धार्मिक शिक्षण,तसेच शरीरपुष्टीचे आरोग्य याची दक्षताहि लहान वयातच मुलांना देण्याची गरज आहे. स्त्रीला घरातील स्वच्छता तसेच धार्मिक,वैदिक यांची साधारण माहिती असणे आवश्यक आहे.पैश्यांचा जमा खर्च,सामान,धनधान्य याची व्यवस्था ( एकंदरीत टापटीप ) तसेच आल्यागेल्याचे आदर-योग्यते नुसार सत्कार, घरातील वडीलधार्यांचे आरोग्य सांभाळायचे,तसेच पतिसेवा इत्यादी हि कुलवान स्त्रियांची कर्तव्ये होत. पुरुष हा विष्णू व स्त्री हि लक्ष्मी मानले जाते. पुरुष हा घरातील ‘राजा’ व ‘स्त्री’ हे राजाचे ‘सौजन्य’ होय.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories