||आरती दशावताराची||
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Aarti Dashavatarachi-This aarti is sung in the glory of god Vishnu. Dashavatara refers to the ten avatars of god Vishnu who is the hindu god of preservation.

Aarti Dashavatarachi

आरती सप्रेम जय जय परब्रम्ह, भक्त संकटी नाना स्वरूपी स्थापिती स्वधर्म ||धृ||

अंबऋषी कारणें गर्भवास  सोशीसी,वेद नेले चोरुनी ब्रम्ह्या आणुनिया देसी |

मत्स्यरुपी नारायण सप्तही सागर धुंडीसी, हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ||१||

रसा तळाशी जाता पृथ्वी पाठीवर घेसी, परोपकारासाठी देवा कासवं झालासी|

दाढे धरुनी पृथ्वी नेतां वराह रूप होसी, प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरी गुरगुरसी ||२||

पाचवे अवतारी बळीच्या द्वाराला जासी, भिक्षे स्थळ मागुनी बळीला, पाताळा नेसी|

सर्व समर्पण केलें म्हणुनी प्रसन्न त्या होसी, वामन रूप घरुनी बळीच्या द्वारी तीष्ट्ती ||३||

सहस्त्रार्जुन वधिला नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला,सहावा अवतार परशुराम प्रगटला ||४||

मातला रावण सर्वा उपद्रव केलां, तेहत्तीस देव बंदी हरिलें सीतेला|

पितृवचना लागीं रामें वनवास केलां, मिळूनी वानर सहित राजाराम प्रगटला ||5||

देवकी वासुदेव बंदीमोचन त्वां केले, नंदा घरी जाउनि निजसुख गोकुळां दिधले|

गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविलें गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ||६||

बौद्ध कलंकी कलियुगीं अधर्म हा अवघा, सांडूनी नित्यधर्म सोडूनी नंदाची सेवा|

म्लेंच्छ मर्दन करिसी म्हणोनी कलंकी केशवा, बहिरवी जानव्ही  द्यावी निजसुखा नंदसेवा||७||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu