Guru Darshana nandachi Aarti-This aarti is sung in the worship of Guru Darshana nanda by their devotees to offer a prayer for them.
फुलले भाग्य माझें धन्य झालो संसारी, सद्गुरू भेटला हो तेणें धरीयले करीं|
पश्चिमेसी चालविलें,आत्मस्तुती निर्धारी त्रिकुटावरी नांदे देखियली पंढरी ||१||
तेणें सुख काय सांगू वाचें बोलता न ये आर्तीचेनि गुणें गेलें मी पण माये ||धृ||
राऊला माजी जातां राहें देह अवस्था , मन हे उन्मत झालें, नसे ब्द्धत्तेची वार्ता|
हेतू मावळला शब्दा आली नि:शब्दता, तटस्थ होऊनी ठेले, निज रूप पाहता ||२||
त्रिगुण गुण बाई, पूर्ण जळल्या वाती, नवलाख अविनाश, न समाये स्वयंज्योती|
पाहता लक्ष तेथें, हालऊ विसरल्या पातीं, नातुडे माझें मज, नाहीं दिवसराती ||३||