” ऑनलाईन कारभार ”
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Online Administration. Nowadays, every activity like form submission, application for job or for any other work all the taska are carried out by online. Some years before or even todays date, In India, government offices were like a large store of bundles of files which consumed a lot of space and were difficult to handle. But Now, the situation is changing and government offices are also becoming digital. It also, giving preference to online administration rather than handling bundles of files.

links

कुठलेही सरकारी काम म्हंटले कि आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे गजबजलेले कार्यालय, पेपरांचे साठलेले गठ्ठे.  गेल्या दशकभरात भारत सरकारने हळूहळू काम ऑनलाईन व डिजीटलाईज्ड करायला सुरवात केली व ह्याच प्रयत्नातून नैशनल पोर्टल ऑफ इंडीयाची स्थापना झाली.

www. india.gov.in

यावर भारत सरकारची  सर्व मंत्रालये, कंपन्या, विभाग व त्याच्या साईटस व त्याच्या साईटसवरील ऑनलाईन सेवा आणि योजना एका छत्राखाली आणल्या गेल्या आहेत. भारताच्या सर्वसाधारण नागरिकालाही वापरता यावे म्हणून हे पोर्टल हिंदीतही उपलब्ध आहेत. या पोर्टलचा आपल्याला कसा व कुठे फायदा होतो ते कळवले आहे, हे अवश्य वाचावे.

* शिक्षण व रोजगार :

सर्वात महत्वाचे म्हणजे या पोर्टलवर आपण एनसीईआरटीची पुस्तके मोफत वाचू शकतो. शिवाय कोणत्याही सरकारी उदा: भारतीय लोकसेवा आयोग व राज्य शिक्षण बोर्डाच्या उदा : एस एस सी (SSC) व एच एस सी (HSC) परीक्षांचे निकाल पोर्टलवर पाहता येते. पोर्टलद्वारे www.educationndia.nic.in व बाकी सरकारी शैक्षणिक साईट्सशी जोडले जाऊ शकतो.

ह्या पोर्टलचा उपयोग करून आपण सर्व राज्यांच्या रोजगार कार्यालयांशी ( एम्पलॉयमेंट एक्सचेंज) जोडले जाऊ शकतो. पोर्टलवर सर्व सरकारी संस्था व कंपन्याच्या परीक्षांचे अर्ज असतात व ते आपण डाऊनलोड करू शकतो.

* कर शुल्क आणि उद्योग :

हे पोर्टल आपल्याला नैशनल सिक्यूरीटीज डिपॉझिटरीच्या साईट्सशी जोडते. त्याशिवाय आपला कर भरण्यासंबंधी सर्व माहिती या पोर्टलवर आहे. या पोर्टलच्या उपयोगाने आपण भारत सरकारच्या उद्योगांना चालना देणाऱ्या अनेक साईट्सशी जोडले जाऊ शकतो.

उदा :  www.coirboard.nic.in

याशिवाय कमोडीटी व फ्युचर्स बाजारातील किमतीसुद्धा आपण या पोर्टलच्या सहाय्याने जाणू शकतो.

* सर्व सरकारी विभागातील तक्रार नोंदणी :

ह्या पोर्टलद्वारे आपण केंद्रीय सतर्कता आयोगाच्या ( सेन्ट्रल व्हिजिलन्स कमिशन ) व प्रशासकीय सुधार व लोक तक्रार विभागाचा साईट्सशी जोडले जाऊ शकतो. या साईट्सवर आपण कोणत्याही  विभाग, कंपनी इ.  कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो. या तक्रारींचा पाठपुरावाही आपण ऑनलाईन करू शकतो. या पोर्टलच्या मार्फत आपण सर्व राज्यांच्या पोलीस यंत्रणांच्या साईट्सशी जोडले जाऊ शकतो, त्यामुळे हरवलेल्या व्यक्ती, चोरीला गेलेल्या व सापडलेल्या मोटारी  इ. माहिती आपल्याला पाहता येतात.

* सरकारी दस्तावेज :

या पोर्टलच्या मदतीने आपण जातीचे, जन्माचे, मृत्यूचे, डोमिसाईल पत्रिका मिळविण्याची प्रक्रिया मिळवू शकतो आणि कुठपर्यंत पोचली ते आपण ऑनलाईन  पाहू शकतो.

पासपोर्ट मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती व त्यासाठी लागणारे सर्व अर्ज या पोर्टलद्वारे उपलब्ध होतात. विदेश दौरा करण्यासाठी पासपोर्ट बरोबर व्हिसाची गरज असते. म्हणून भारतात ज्या देशांचे दूतावास आहेत त्या सर्व देशांची यादी त्यांचे सर्व पत्ते, कार्यालयीन वेळा इ. या पोर्टलच्या मदतीने आपणास कळते.

* सरकारी कायदे व नियम :

या पोर्टलवर भारताचे संविधान पीडीएफ फ़ॉरम्यटमध्ये आहे. भारतीय संसदेने व सर्व राज्यांच्या  विधानसभा, विधानसभा परिषदांनी संमत केलेल्या कायद्यांचे तपशील , नियम, अधिनियम, ग्याझेटीयर्स, ऑक्ट व त्यातील बदल ( त्यांतील तळटीपांसकट) सेक्शन्स, शेड्यूल्स पोर्टलवर नियमित प्रकाशित  केले जातात.

केंद्र व सर्व राज्य सरकारने उद्घोषित केलेल्या लोकोपयोगी योजनांचा तपशील व त्यांचा सामान्य  माणसाला होणाऱ्या उपयोगाची माहिती पोर्टलवर आहे.

* टेलिफोन व दूर संचार :

या पोर्टलवर आपल्याला ऑनलाईन डिरेक्टरी उपलब्ध आहे. भारताच्या सर्व शहरांचे पिन-कोड, एस.टी.डी क्रमांक व जगातील सर्व देशांचे आयएसडी क्रमांकाची यादी पोर्टलवर मिळते. पत्र पाठवण्यासाठी लागणारे पोस्टेजची किंमतसुद्धा पोर्टलद्वारे काढता येते. बीएसएनएल मोबाईल्स तसेच फोनचे बिल तपासून भरणे, त्यांची प्रिंट घेणे व त्याबरोबर आपल्याला बिलाचे एसएमएस रीमाईडर्स येण्याची सोय पोर्टल वर आहे.

* मनोरंजन व पर्यटन :

या पोर्टलच्यामार्फत आपण दूरदर्शन वाहिनीवरचे सर्व कार्यक्रमाचे व्हिडीओज लाईव्ह व रेकॉर्डिंगही पाहू शकतो. शिवाय भारतातील सर्व पर्यटनस्थळांची माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे. हल्ली पर्यटकांची काही टुर्स ऑपरेटर्सकडून फसवणूक होत असल्याने पोर्टलवर सर्व सरकारमान्य टूर ऑपरेटर्सची यादी मिळते.

* सरकारी अधिकाऱ्यांची माहिती :

या पोर्टलवर सर्व प्रमुख पुढारी नेते व सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायधीश आणि सर्व सुरक्षा दलांचे प्रमुखांचे बायोडेटा आहेत.

लिहिलेल्या सर्व सरकारी प्रयत्नांचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा आपण सरकारी कामासाठी इंटरनेटचा योग्य उपयोग करून आपला व सरकारचा वेळ आणि पैसा वाचवू पण सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे प्रशासकीय व्यवहारात पारदर्शकता येते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu