Blood Donation… Greatest Donation for a life. There are lots of types of donations but donating blood to save a life of someone is the greatest than all other materialistic donations. But finding out the donor is the difficult task. So to save the time, internet is again proved a useful tool. It helps to find out donors and blood banks and so a powerful tool in order to save a life.
दान हा शब्द आपल्या मनुष्यजातीसाठी काही नवीन नाही, पण आजकाल याचे महत्व अजिबात नाही. तेव्हा जर याची व्याख्या समजून घेतली तर ते सहज शक्य आहे. दान म्हणजे फक्त रुपया, धन यात अडकलेले नाही, तर ते आपण कोणत्याही रुपात करू शकतो व त्याचे महत्व सर्वरूपी समान आहे.
शस्त्रक्रियेसाठी किंवा एखादा अपघात घडल्यानंतर बऱ्याच वेळेस रुग्णांना गरज असते ती रक्ताची आणि हे प्रसंग अचानक ओढावल्यानंतर आपली तारांबळ उडते. परंतु असे होऊ नये व रुग्णाची ही गरज भागविण्याकरीता हल्ली ऑंनलाईन ब्लडडोनर्सची यादी असणाऱ्या साईट उपलब्ध आहेत. याशिवाय अनेक रक्तदाते या साईटचा उपयोग करून रक्तदानसारखे श्रेष्ठ दान करू शकतात.
www.bharatbloodbank.com व www.friendstosupport.org ही अशी संकेत स्थळे आहेत ज्यावर अनेक रक्तदाते रजीस्टर्ड आहेत व त्यांची संपूर्ण माहिती ( उदा. नाव फोन नंबर, रक्तगट, शेवटचे रक्त दिल्याची नोंदणी ) मोफत उपलब्ध करून दिली जाते.
* रुग्णांसाठी ऑनलाईन रक्तपेढी :
या साईट्सचा प्राथमिक उपयोग रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी त्वरित रक्ताची सोय करणे हा आहे. त्यासाठी या साईट्सवर अगोदर उल्लेखिल्याप्रमाणे रक्तदात्यांची यादी, त्यांचे नाव, संपर्क क्रमांक, रक्तगट, लिंग इ. असते. ही यादी मिळविताना आपल्या सोईसाठी या साईट्स सांगितल्याप्रमाणे आपल्या सोयीसाठी या साईट्सवर फिल्टर उपलब्ध आहेतं त्यांचा उपयोग केल्यास शोध सोपा होतो.
उदा : समजा एखाद्या व्यक्तीला जर ओ+ अधिक रक्ताची आवश्यकता आहे व तो रुग्ण ‘मुंबईत’ अंधेरीला राहात असेल तर अशा रुग्णासाठी रक्तदाता शोधताना आपण रक्त गटामध्ये ओ+ निवडणार, नंतर भारतातील राष्ट्रांमध्ये ‘महाराष्ट्र’ जिल्ह्यांमध्ये ‘मुंबई’ ‘उपनगर’ व शेवटी ‘अंधेरी’ असे पर्याय निवडणार.
हे सर्व फिल्टर्स आपण लावले की ‘ओ+’ रक्त गटाच्या महाराष्ट्रातील मुंबई उपनगराच्या अंधेरी भागात राहाणाऱ्या सर्व रक्तदात्यांची यादी आपल्याला दिसेल.
* रक्त दात्यांची नोंदणी
रक्तदाते म्हणून आपण या साईट्स वर नोंदणी करीत असाल तर आपल्याला आपला संपर्क क्रमांक, नाव व रक्तगट हि आपली वैयक्तिक माहिती येथे द्यावी लागते. आपली ही माहिती सर्व जगाला दिसेल याचे भान व तयारी आपण ठेवली पाहिजे. कारण रक्ताची गरज असणाऱ्याला ह्या साईट्सवर आपली हि माहिती ऑनलाईन दिसणे गरजेचे असते. या साईट्स वर रक्तदाते म्हणून आपले शारीरिक गुण व क्षमता काय व किती असली पाहिजे त्याची यादी आहे. रक्तदात्यांना त्यांची शारीरिक क्षमता सुधारण्या साठी सल्ले, रक्तदानाबाबत गैरसमजुती दूर करण्यासाठी रक्त व रक्तदानाबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी या साईट्सवर धडे व ज्ञान उपलब्ध आहे.
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती सामाजिक बांधिलकी म्हणून आपण रक्तदान केलेच पाहिजे. असे म्हणतात ‘की दिल्याशिवाय मिळत नाही’ , त्यामुळे बांधिलकी वगैरे जड जड शब्दांचा वापर न करता आपण एवढाच विचार केला की आज जर मी दुसऱ्याला मदत केली तरच माझ्या गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे येणार.
*या साईट्सचे काही फीचर्स
www.bharatbloodbank.com वरून आपण आपल्या परिचितांनाही ई-मेल पाठवून रक्तदानाकरीता प्रोत्साहित करू शकता.
जर आपल्याला रक्तदानाच्या पवित्र कामात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर www.friendstosupport.org वर आपण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करू शकतो.
www.bhartbloodbank.com वर भारतातील २४० रक्तपेढ्यांची यादी आहे. यात आपण विशिष्ट राज्य व शहरांमधील रक्त पेढ्यांची माहितीही शोधू शकतो. या यादीत असणाऱ्या रक्तपेढ्यांची सर्व माहिती ( नाव, संपर्क व्यक्ती, संपर्क माहिती, पत्ता इ. ) या साईट्सवर उपलब्ध आहेत. जर एखादी रक्तपेढी या यादीत समाविष्ट करावयाची असेल तर तेही होऊ शकते. त्याकरीता रक्तदाता म्हणून मला आलेले अनुभव किंवा मिळालेली संतुष्टता याचे कथन या साईट्सवर करू शकता कारण हे वाचून इतरही रक्तदानासाठी प्रोत्साहित होऊ शकतात.
*ऑनलाईन आयबँक
www.bharatbloodbank.com चीच अजून एक साईट आहे www.bharateyebank.org या साईट्सवर आपण नेत्रदाता म्हणून नोंदणी मोफत करू शकतो. त्यानंतर ह्या साईट्सकडून ‘आय प्लेज कार्ड ‘ दिले जाते. या कार्डाच्या उपयोगाने आपल्या पश्चात आपल्या डोळ्याने दान करण्याची सूचना व सोय करून ठेवता येते.
www.sankaraeye.com व www.rajaneyecare.com या दोन साईट्स आहेत ज्या नेत्रदाता म्हणून नोंदणी करून घेतात व या साईट्सवरून डोळ्यांच्या रुग्णांना ऑनलाईन मोफत सल्ला मिळतो.
भारतात वर्षाकाठी किमान ९० लाख रक्तांच्या बाटलांची आवश्यकता असते पण त्यातील ३३ टक्के गरज अपूर्णच राहते. त्यासाठी आपण प्रार्थना करू या की आपल्या कोणत्याही आप्ताला त्याच्या गरजेच्या वेळेस रक्ताच्या तुटवड्यामुळे त्रास सोसावा लागू नये.
पवित्र ग्रंथामध्ये ‘रक्त दान हे श्रेष्ठ दान ‘ असल्याचा उल्लेख सापडतो. तेव्हा आता रक्तदानासाठी तयार व्हा.
* भारत ब्लड बँक आणि * भारत आयबँक