संत चमत्कार का करतात ?




Like
Like Love Haha Wow Sad Angry
12

A miracle is an event not explicable by natural or scientific laws. Such an event may be attributed to a supernatural being (God or gods), a miracle worker, a saint or a religious leader. in Hindu mythology wherein “wondrous acts are performed for the purpose of bringing spiritual liberation to those who witness or read about them.”

Dnyaneshwar_humbles_Changdev

आजच्या या कलीयुगात चमत्काराशिवाय नमस्कार कुणीही करीत नाही, ही वन्दिता ईश्वराला ठाऊक असल्यामुळे, ईश्वर खऱ्या संतांच्या अनाकलनीय लिलेलाच चमत्काराचा परिणाम दर्शवितो; त्यालाच चमत्कार म्हटले जाते. कुठल्याही घटनेमागील कार्यकारणभावाचा थांगपत्ता न लागणे म्हणजेच  चमत्कार, असे म्हणता येईल.

खरे संत चमत्कार करीत नाही पण ईश्वरच त्यांच्या भक्तांची श्रध्दा, विश्वास, निष्ठा, भक्ती वाढावी म्हणून संतांच्या हातून चमत्कार घडवून आणतात. भक्तांची आत्मा सतत निरोगी राहावी यासाठी चमत्काराची योजना ईश्वरच करीत असतो. एखाद्या भक्ताला संस्कारित करावयाचे असल्यास चमत्कार घडवितो व त्याची श्रध्दा सतेज करितो. एखाद्या नाठाळ भक्ताला वठणीवर आणावयाचे असल्यास तेव्हाही संताकरवी चमत्कार घडवितो. कधी कधी आपला शिष्य किती महान झाला आहे किंवा अधिकारी पुरुष झाला याची खुणगाठ इतरांना करून देण्याकरिता संतांच्या नावे चमत्कार घडवितात. तसेच मानवापेक्षा ईश्वर किती महान, शक्तिमान आहे हे दाखविण्याकरीता संतांचे हातून चमत्कार घडलेले आहेत. ईश्वराची आपल्यावर किती कृपा आहे!  हा ही एक चमत्कारच आहें ना !

संतांची शिकवण !

खरे संत मानवाला एकदम ईश्वराचा मार्ग स्वीकारा असे म्हणत नाही. संसारबंधनातून किंवा मायेतून मुक्त व्हा, मोक्ष प्राप्तीचा प्रयत्न करा, मुक्या प्राण्यांवर दया करा, अनाथांना किंवा लाचार अशा लुळ्यापांगळ्याला आधार द्या किंवा मदत करा; सर्वांशी प्रेमपूर्वक वागा; मोठ्यांचा, देव, धर्माचा, संताचा आदर करा; भगवतभक्तीत रममाण व्हा; धार्मिक उत्सव एकोप्याने साजरे करा; अन्नदान करा याप्रकारे संतांची शिकवण असते. पण आपण हे सर्व सोडून अहंकाराच्या मस्तीत धुंद असतो. संतांकडे जाताना एकदम नम्र व ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणे बनून जावे लागते, हा साधा नियम विसरून जातो , आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्या शिकवणीचा लाभ होत नसतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
12







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu