In our ancient scriptures, epics,vedas etc many interesting stories are there. In this article, some of stories from our valuable scriptures are given :
देख पा जनकादिक । कर्म जात अशेख ।
न सोडिता मोक्ष सुख । पावते जहाले ।।
अर्थकथा :- जनक (ईक्ष्वाकूपुत्र निमी याचा, वशिष्ठ शापाने देहपात झाल्यानंतर, देवाच्या सांगण्यावरून निमीच्या देहाचे मंथन केले. तेव्हा त्या मंथनापासून उत्पन्न झालेला पुरुष) यानेंच मिथिला नगरी उभारली. हा महान भगवतभक्त व ब्रम्हवेत्ता होता.
*****************************************************************************
मृत गुरु पुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला ।
तो हि मी उगला । कर्मी वर्ते ।।
अर्थकथा :- सांदिपनी (कश्यप कुळातील, उज्जयिनीस राहाणारा एक ऋषी) भगवान श्रीकृष्ण, बलराम व त्यांचा स्नेही सुदामा यांनी सांदिपनीजवळ वेदाध्ययन केले. गुरुनिषकृतिकाम भगवान श्रीकृष्णानी त्यांच्या इछेवरून त्यांचा मृतपुत्र परत आणून दिला.
*****************************************************************************
मग देव म्हणे पंडूसुता । हाचि योगु आम्ही विवस्वता ।
कथिला परी ते वार्ता । बहुतां दिवसांची ।।
अर्थकथा :- विवस्वान (बारा आदित्यांतील एक) याला त्याच्या संज्ञा नामक पत्नीपासून श्राद्धदेव, यम, आणि यमुना हि तीन अपत्ये झाली. मन्वंतराच्या आरम्भी हा ज्ञानयोग व बुद्धियोग, मी विवस्वानास आणि विवस्वानाने आपला पुत्र; चालू मन्वंतराचा अधिपती स्वयंभुव मनु त्यास सांगितला आणि मनूने इक्ष्वाकुला अशी हि ज्ञानपरंपरा माझ्यापासून चालू झाली आहे; आजच तुला सांगतो असे नव्हे.