मानवी मन (भाग-२)
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Human mind is one of most amazing interesting part in the world. We can call it as a engine of our life. our minds shape our personalities throughout our lives, and reveals how personality traits like extroversion and introversion develop. It is the mind who decide how our life will be at times. The one who has control over their minds, can control their life on their own.

Human mind

मन कधी कमकुवत तर कधी गमावत; तरी या अनाकलनीय मनात गरगरत उठणाऱ्या प्रश्नांना मिळतो विराम.  एखाद्या कोपऱ्यात विसावतात काही क्षण, तेव्हा मात्र मनाच पाखरू उडत जातं  ते विस्तीर्ण निळ्या आकाशाच्या भव्य पटलावर सूर्य, तारे, नक्षत्र  यांना स्पर्श करण्याकरीता किंवा भेटण्यासाठी मोठमोठ्या ढगांवर स्वार होत.

इंद्रधनुष्याच्या झुल्यावर झुलून साऱ्या अवकाशाला कवेत घेत, प्रत्येक स्थळावरचा विलक्षण आनंद लुटून येतं हे मन. याक्षणी मनाला त्रिलोक जिंकल्याचा अविर्भाव असतो. यासाठी मनाला हवा असावा लागतो बुद्धीचा उंबरठा, संयमाचे दरवाजे व निश्चयाची साखळी.

आपल्या काळजातील कल्लोळ आपल्याशिवाय कुणाला ऐकू येतो काय ?  पण तरीही काही महान व्यक्ती मन जाणणारी व नजरेच्या टप्प्यातून मनाची बोली ओळखणारी, अशी मनकवडी असतात.

कधी उथळ उपभोगाची लालसा तर दुसऱ्याच क्षणी निरामय जीवनमूल्याची शाश्वती; या क्षणी उठणारा मनातील भावनांचा झंझावात, ज्याला जिंकता आला तोच खरा ‘अजिंक्य’. पण जेव्हा मन  भावनांच्या प्रचंड वेगात वाहतं तेव्हा त्याला सावरण फारच अवघड होत हेही तितकच खरं. तेव्हा आपलच मन आतल्याआत, आपल्याला कुरतडत राहतं. वरून भक्कम व डौलदार दिसणार शरीर, आतून पोकळ डोलारा बनतं…. आधार नसलेलं आत्मशून्य; आत्मविश्वास हरवलेला असा आणि त्यावर उमटणार उसने हसू. लपवालपविच्या प्रयासाने ते अधिकच केविलवाणे बनत जाते. नंतर मन मारून जगताना प्रत्येक परिस्थितीला शरण जातं किंवा बंड उभारून शेवटी स्वत:ला संपविण्याची तमा बाळगतं.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu