सांबसदाशिव महिमा ( मुक्तेश्वर )




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Shiva is one of the main deity among all other deities in Hindu religion. Shiva is ‘shakti’ or power, Shiva is the destroyer, the most powerful god of the Hindu pantheon and one of the godheads in the Hindu Trinity. Known by many names – Mahadeva, Mahayogi, Pashupati, Nataraja, Bhairava, Vishwanath, Bhava, Bhole Nath – Lord Shiva is perhaps the most complex of Hindu deities. Hindus recognize this by putting his shrine in the temple separate from those of other deities.

shiva

फाल्गुन मास वर्षाचा बारावा म्हणजेच शेवटचा महिना. फाल्गुन मासातली कृष्णपक्षातील चौदावी रात्र म्हणजे ”महारात्री” आहे; तीच कल्पाच्या शेवटी होणाऱ्या घोर अज्ञान व अपवित्रतेची सूचक आहे.

”शिवरात्री” फाल्गुन मासाच्या कृष्णपक्षाच्या शेवटच्या रात्रीच्या एक दिवस साजरी करतात.

शिवाचे या लोकांत अवतरण कलियुगाच्या पुर्नन्ताच्या काहीच वर्ष आधी झालं होतं. त्यावेळी  संपूर्ण सृष्टी अज्ञानअंधकारात होती. म्हणूनच शिवाच्या संदर्भात पूजेला फार महत्व प्राप्त झालं आहे. श्रीविष्णू किंवा श्रीरामासारख्या देवतांची पूजन दिवसाढवळ्या करतात कारण श्रीविष्णू अवतार त्रेतायुगरुपी दिवसात झाला होता. मात्र शिवाची पूजा भक्त रात्रभर जागरण करूनच करतात. परंतु या रहस्याला फार कमी लोक जाणतात. शिव तमोगुणाचे अधिष्ठाता( आधार) आहेत. म्हणून शिवभक्त त्यांची पूजा अंधाऱ्या रात्री करतात.

‘शिवाचे स्मरण करून शिवरात्री साजरी केली जाते कारण रात्र ही तमोगुणाची प्रतिनिधी आहे’, असे मानतात. परंतु ही मान्यता फार चुकीची वाटते. शिव तमोगुणाचे अधिष्ठाता मुळीच नसून उलट ते तमोगुणाचे संहारक आणि विनाशक आहेत. जर शिव तमोगुणाचे अधिष्ठाता राहिले असते तर त्यांना ‘शिव’, ‘पापकटेश्वर’ आणि ‘मुक्तेश्वर’ म्हणणे निरर्थक झाले असते. कारण ‘शिव’ या शब्दाचा अर्थच आहे “कल्याणकारी”; जेव्हा की तमोगुण अकल्याणकारी, पापवर्धक आणि मुक्तीत बाधक आहे.

खरे तर ‘शिवरात्री’ याच कारणासाठी साजरी केली जाते की, परमात्मा शिवाने कल्पाच्या उपान्तात अवतार धारण करून तमोगुण दु:ख, क्लेश आणि अशांती वर विजय मिळविला होता. या सर्व दोषांना हरविल्यामुळेच शिवाला ‘हर’ ही संबोधतात.

म्हणूनच शंकराची भक्ती करताना भक्त भावविभोर होऊन म्हणतात ‘हर हर महादेव ‘ हर हर महादेव’.  शंकराच्या गृहांगनात बैल आणि वाघ व मोर आणि सर्पालाही एकत्र असल्याचे दर्शविणारे चित्र खरं सांगायचे तर, याच रहस्याचे परीचायक आहे की शिव तमोगुण, द्वेष वगैरे दोषांना हरविणारे आहे; या दोषांचे ते अधिष्ठाता तर नक्कीच नाही.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu