Sant Gyaneshwar is one of most well-known saint from maharashtra. He was a great devotee of Vitthala-Rakhumai of Pandharpur.He had composed many shlokas.
Gyaneshwar made a composition on Bhagavad Gita called Gyaneshwari. Till date it is the most popular book in Marathi on Bhagavad Gita. Here are some stories presented from Gyaneshwari.
१ ) त्या गीतार्थाची करी । स्वये शंभू विवरी ।।
जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारोनी।।
पद्मपुराणामध्ये श्री शंकर-पार्वती संवादात अशी कथा आहे कि, भगवान शंकर नेहमी गीता वाचीत असत. तेव्हा पार्वतीने प्रश्न केला,
तुम्ही रोज रोज गीता वाचतां, तेंव्हा त्या गीतेचे असे काय महत्व आहें?
यावर शंकराने उत्तर दिले,
हे पार्वती(माया), तुझे जे नित्यनूतन स्वरूप आहे, त्याचप्रमाणे ही ”गीता” नित्यनूतन आहे.
२) किं टिटिभू चांचूवरी । माप सुये सागरीं ।।
मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें तेथ।।
(टिटिभू :-पक्षाची जात ( टिटवी ) )
या टिटिभू पक्षीणीने समुद्राचे किनाऱ्यावर दरडीत आपली पिले ठेवली होती. समुद्रास भरती आल्यामुळे तिची पिले समुद्रांत वाहून गेली. समुद्रानेच आपल्या पिलांचा नाश केला, अशा समजुतीने तिने आपल्या चोचीने समुद्र आटवण्याचा कृतनिश्चय केला; व त्याच प्रमाणे तिने सुरुवातही केली. ” हे काम तुझ्या हातून होणे अश्यक्य आहे “, असा इतर पक्ष्यांनी तिचा निषेधही केला पण ती समुद्र आटविन्याच्या कामांपासून परावृत्त झाली नाही. तिचा तो दृढनिश्चय पाहून, नारदांना दया येऊन त्यांनी ती हकीकत पक्षीराज गरुड यांना कळवून, ‘ तिला मदत कर ‘ असे सुचविले. गरुडाने येउन आपल्या पंखांनी समुद्र आटविन्यास सुरुवात करताच समुद्रास भीती वाटली; व तो गरुडास शरण गेला. गरुडाच्या सांगण्यावरून त्यानें टिटिभी ची पिल्ले परत आणून दिली.
( ज्या गीतेची थोरवी वर्णन करण्यात शंकरही साशंक होतात, असे हे गीतेच्या व्याख्यानाचे कर्म संतांच्या सहाय्याने अल्पबुद्धी मी पार पाडेन; असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात.)
1 Comment. Leave new
ज्ञानेश्वरीतील आध्याय व ओवी याचा क्रमांक देणे इष्ट. त्याप्रमाणे वाचकास मूळ ग्रंथामधून अधिक ज्ञान प्राप्त होईल असे वाटते.